शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पाडव्यानिमित्त बाजारात लाखोंची उलाढाल

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

जालना : दीपावलीच्या पाडव्यानिमित्त बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यात प्रामुख्याने वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली.

जालना : दीपावलीच्या पाडव्यानिमित्त बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यात प्रामुख्याने वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. दिवाळीचा पाडवा सोडतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणून ओळखला जातो. यासाठी अनेक ग्राहक खरेदीस प्राधान्य देतात. हाच मुहूर्त साधून जालनेकरांनी दुचाकीसह चारचाकी वाहने, विविध सोन्याच्या वस्तू, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार फ्लॅट खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. अनेक वाहने तसेच वस्तूंची विक्रीही चांगली झाली. दिवाळीनिमित्त यंदा चार दिवसांपासून बाजार फुलला होता. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात ग्राहकांसाठी नवनवीन आकर्षक अशा योजनाही उपलब्ध होत्या. साधारणपणे विविध सर्व प्रकाराचे मार्केट मिळून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्यचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.इलेक्ट्रॉनिक बाजारात यावर्षी चांगली गर्दी दिसून आली. यात प्रामुख्याने टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, एअर कंडिशनर, मुझिक सिस्टीम खरेदीस ग्राहकांची पसंती होती. याविषषी अधिकारी माहिती इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयराज सुराणा यांनी सांगितले की, यंदा इलेक्ट्रॉनिक बाजारात ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती. एलईडी टीव्ही, होम थिएटर, फ्रिज व वॉशिंग मशीनची मोठी विक्री झाली.आकर्षक योजना तसेच सुट जाहीर केल्याने ग्राहकांनी प्रतिसाद दिला होता. पावसाने ओढ दिल्याने व्यवहारावर काही अंशी परिणाम झाल्याचे सुराणा यांनी सांगितले. बँडेड कंपन्यांच्या वस्तंूची मोठी मागणी असल्याचे ते म्हणाले. दुचाकी वाहन बाजारातही पाडव्यानिमित्त ग्राहकांनी गर्दी केली होती. होंडा , हिरो, बजाज, सुझकी तसेच टीव्हीएसची दुचाकींची चांगली विक्री झाली. प्रत्येक वाहनांच्या शोरुमजवळ अनेक बँकांचे प्रतिनिधींनी कर्जपुरवठा करण्यासाठी तळ ठोकला होता. याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला. दुचाकींची विक्री झाली. महिला तसेच तरुणींकडून अ‍ॅक्टिव्हा तसेच अ‍ॅक्टिव्हा आय दुचाकींची मागणी होती. तर हिरोच्या स्पेलंडर, मॅस्ट्रो तर बजाजच्या विविध दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे सांगण्यात येते. चारचाकी वाहन नोदंणीसाठी बँक तसेच प्रतिनिधींकडे विचारणा तसेच नोंदणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी दुचाकी अथवा सोने खरेदीऐवजी आपले हक्काचे घर खरेदी करणे पसंत केले. शहरातील बिल्डर्स व डेव्हलपर्सकडे शेकडो जणांनी घरांची नोंद केल्याचे सांगण्यात आले. यात प्रामुख्याने तयार घरांना मोठी मागणी असल्याचे बिल्डस अविनाश भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी घर नोंदणी केली. काही बिल्डर्सनी घराचे डेमो तसेच साईटही दाखविल्या. काही वर्षांत घर बांधण्यापेक्षा तयार घर खरेदीकडे अनेकांनी कल वाढविला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार जालना शहरातही अत्याधुनिक व सर्वसोयी युक्त घर बांधली जात आहेत. (वार्ताहर)