शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वाळूज भागातून मनपाला पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:19 IST

शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.

ठळक मुद्देकच-याचा प्रश्न: जंगजंग पछाडूनही अपयश पदरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.मनपा प्रशासनाने मंगळवारी रात्रीच खंडेवाडी शिवारात खाजगी व्यक्तीच्या जागेवर कचरा टाकण्याचा प्लॅन आखला होता. प्लॅननुसार सकाळी ६ वाजता कचरा टाकण्यात आला. पहिला प्रयोग यशस्वी होताच मनपाने दुसºया टप्प्यातील ट्रकही या भागात बोलावून घेतले. ट्रक वाळूज-हनुमंतगावमार्गे पैठण तालुक्यातील खंडेवाडी-नायगव्हाण शिवाराकडे जाताना नागरिक व शेतकºयांनी पाहिले. काही नागरिकांनी या ट्रकचा पाठलाग केला. खंडेवाडी शिवारातील एका मोठ्या खड्ड्यात कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसले. नागरिकांनी ट्रक अडविले. घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी अधिकाºयांना घेराव घालत कचरा डेपो सुरू करण्यास विरोध दर्शविला. कचरा डेपो सुरू करण्यापूर्वी आम्हाला विष द्या, कचºयाच्या गाड्यांखाली आम्ही झोपू, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकाºयांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी वाळूजचे काकासाहेब चापे, दयानंद साबळे, ग्रामपंचायत सदस्य पपीन माने, थॉमस साबळे आदींसह हनुमंतगाव, नायगव्हाण, खंडेवाडी, नायगाव आदी भागांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सहा. पोलीस आयुक्त डी.एन. मुंढे, पो.नि. सतीश टाक आदींचा फौजफाटा घटनास्थळी होता.शासनाच्या सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत पैठणखेडा ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. याठिकाणी कचरा डेपो सुरू करू नये, अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. या निवेदनावर सरपंच लता ढगे, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर राघुडे, सोमीनाथ देसाई, दत्तात्रय देसाई, बाबासाहेब गरड, कल्याण राघुडे, बाळू गरड, उत्तम गायकवाड, पंडित पवार, शिवसिंग राणा, सोनाली देसाई, प्रभू गायकवाड आदींची स्वाक्षरी आहे.नारेगावमुळे सर्वत्र बदनामीमनपाने सर्वप्रथम पैठण रोडवर बाभूळगाव, पडेगाव-मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; पण मनपाला यश आले नाही. मनपाच्या नारेगाव प्रकल्पाची एवढी बदनामी झाली आहे की, मनपाला कुठेच कचरा टाकण्याची परवानगी मिळणे शक्य नाही.