शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

‘मग्रारोहयो’ बारगळली

By admin | Updated: June 25, 2014 00:38 IST

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात मग्रारोहयो योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा यासाठी शेकडो कामे करण्यात येवून मजुरीही अदा करण्यात आली

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात मग्रारोहयो योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा यासाठी शेकडो कामे करण्यात येवून मजुरीही अदा करण्यात आली, मात्र गेल्या तीन वर्षापासून साहित्य खरेदीचे ३ कोटी रुपये थकविण्यात आल्याने तालुक्यातील सरपंच व जबाबदार पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत.माहूर तालुक्यात शेतकरी व व्यापाऱ्यांची संख्या कमी तर मजुरांची संख्या जास्त असल्याने माहूर तालुक्यात २९० हजारांवर मजुरांची नोंद झाली आहे. तसेच नोंदीत बांधकाम मजुरांची संख्या २० हजारापेक्षा जास्त असूनही एकाही नोंदीत बांधकाम कामगारास शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मग्रारोहयो योजनेत २० हजारांवर मजुरांची नोंद होवूनही फक्त यावर्षी ३७०० मजुरांना काही दिवस काम देण्यात आले तर ईतर मजुरांना कामे देण्यात न आल्याने या मजुरांनी कामासाठी स्थलांतर केले आहे. सध्या माहूर तालुक्यातील ११७२ मजुरांना कामे देण्यात आली असून यामध्ये आसोली-१९६, रुपानाईक तांडा- १०१ भोरड-६२, मेंडकी-१३, पापलवाडी -२०६, कुपटी-६७, दत्त मांजरी -१४, तांदळा-७२ , रुई-२७, गोकुळ गोंडेगाव- ६७, वाईबाजार- ११६, अंजनखेड- ४६, आष्टा- ७० ही कामे ग्रामपंचायती मार्फत १०५७ मजुरांना देण्यात आली. कृषी विभगाकडून वानोळा येथे एका कामावर ३८ मजुरांना कामे देण्यात आली असून सामाजिक वनीकरण विभागाकडून वाई बाजार येथे ६५ पडसा येथे व रस्त्यावर झाडे लावून संगोपनासाठी १२७ मजुरांना कामे देण्यात आली आहेत. एकूण ११७२ मजूर सध्या कामावर असून पाऊस पडल्यास या सर्व मजुरांना कामे देणे बंद करण्यात येते. पावसाळ्यात सर्व मजुरांना कामे मिळतात हा या मागचा समज असल्याने हजारो मजुरांवर शेतात काम करणारे ट्रॅक्टर्स व इतर मशिनरीज उपासमारीची पाळी आणणार आहेत.सन २०१३-१४ च्या मजुरी अदायगीच्या अहवालात ६० टक्के खर्च मजुरांवर तर ४० टक्के खर्च साहित्यावर करावा असा शासनाचा आदेश असल्याने जिल्ह्यातील ईतर तालुक्यात मजुरांची ५० टक्के रक्कम व साहित्याची ५० टक्के रक्कम देण्यात आली असून माहूर तालुक्यात चित्र उलटे आहे. मजुरी पोटी ११६.३८ (९७.४२) टक्के देण्यात आले तर साहित्यापोटी ३.०८ देण्यात आले. याची टक्केवारी फक्त (२.५८) टक्के आहे. पदाधिकारी मजुराना जनजागरणाद्वारे कामे सुरू करावयास लावायची प्रसिद्धी मिळवायची व मजुरी व साहित्याच्या रक्कमेसाठी चकरा मारावयास लावायच्या यामुळे पदरमोड करुन पूर्ण करण्यात आलेल्या कामावरील खर्च निघत नसल्याने सरपंच व ईतर संबंधित व्यक्ती येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. (वार्ताहर)११७२ मजुरांची उपस्थितीरुग्णालतालुक्यात ११७२ मजुरांनी उपस्थिती माहूर तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कार्यालयातील संगणकात असतात. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असून याच्या विपरीत परिस्थिती जिल्हाधिकार्यालयातून देण्यात येत आहे. साप्ताहिक अहवालात एकूण मजूर उपस्थितीच्या ठिकाणी एकूण मनुष्य दिनाचा अहवाल मजूर उपस्थितीच्या रकान्यात टाकला जात असून तालुक्याच्या अहवालात मजूर उपस्थिती ११७२ तर जिल्ह्याच्या अहवालात मजूर उपस्थिती ७०३२ ईतकी दाखवून बोळवन केली जात आहे. प्रत्यक्षात सदर योजना अधिकारी वर्ग बारगळवून मजुराना उपासमारी व भुकबळीच्या खाईत लोटण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.