शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

‘एसटी’ चा तोटा कोटीच्या घरात

By admin | Updated: September 14, 2014 23:36 IST

नांदेड : एसटी महामंडळाच्या स्थानकावरूनच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि काळीपिवळी चालक प्रवासी पळवत असून त्यामुळे एसटीचे कोट्यवधींचे उत्पन्न खाजगी वाहतूकदारांच्या घशात जात आहे़

नांदेड : एसटी महामंडळाच्या स्थानकावरूनच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि काळीपिवळी चालक प्रवासी पळवत असून त्यामुळे एसटीचे कोट्यवधींचे उत्पन्न खाजगी वाहतूकदारांच्या घशात जात आहे़बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर खाजगी बसेस, काळीपिवळी वाहने उभी करू नयेत, तसेच स्थानकात येवून प्रवासी घेवून जाणाऱ्या एजंटावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत़ मात्र नांदेडसह जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव, देगलूर, बिलोली, कंधार, लोहा, किनवट, भोकर आदी बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या काळीपिवळीच्या एजंटला कोणताही अटकाव केला जात नसल्याचे चित्र दिसते़ एजंट आणि काळीपिवळी चालकांवर बसस्थानकातील पोलिस, नियंत्रक आणि आरटीओचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते़ बसस्थानक आणि परिसरात प्रवाशांना पकडून एजंट त्यांना कमी भाड्याचे आमिष दाखवून खाजगी बस अथवा काळीपिवळीने प्रवास करण्यास भाग पाडतात़खाजगी वाहतुकीमुळे राज्यात एसटीचे जवळपास ७०० कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेनी केला आहे़ खाजगी वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय ८ जानेवारी २००२ रोजी औरंगाबाद खंडपीठाने दिला होता़ परंतु वाढती खाजगी वाहतूक पाहून या निर्णयाचा कुठेच अंमल होत नाही़ एसटीचे जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १ कोटीचे उत्पन्न बुडते़ तसेच एसटीचे काही चालक वाहकांचा हलगर्जी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठी धोरणाचा फटका उत्पन्नाला बसतो़ जिल्ह्यातील नांदेड - अर्धापूर- हिंगोली, नांदेड - वारंगा- हदगाव, नांदेड - भोकर- किनवट, नांदेड- नर्सी-नायगाव- देगलूर, नांदेड- बिलोली, नांदेड- पूर्णा, नांदेड- लोहा आणि कंधार या मार्गावर खाजगी बस तसेच काळीपिवळी तर नांदेड- वसमत आणि पूर्णा मार्गावर आॅटो मोठ्या प्रमाणावर धावतात़ (प्रतिनिधी)