भोकरदन : भोकरदन शहरात सोने उजळुन देण्याचा बहाना करून दोन भामट्यांनी तीन महिंलाचे १ लाख रूपयाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल केली गेली नव्हती. या बाबतची माहीती अशी की चार दिवसा पुर्वी शहारातील बालाजी नगर नवे भोकरदन येथे २० ते २५ वर्ष वयोगटातील दोन तरूणांनी पितळेची भांडे उजळुन देतो म्हणुन या भागात काही महीलांना भुरळ घातली. या तरूणांनी सोन्याचे दागिने सु्ध्दा उजळता येते असे या महिलांना सांगितले. या आमिषाला बळी पडत तीन महिलांनी आपल्या गळ्यातील सोन्याच्या पोत या तरूणांकडे दिल्या. या पोत एका डब्यात टाकल्याचा भास करून हा डब्बा पंधरा मिनिट गॅसवर गरम होऊ द्या असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. तुम्ही डब्बा लवकर गॅस वरून काढला तर मात्र दागिने उजळणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलांनी हा डब्बा गॅस वरून लवकर खाली घेतला नाही. गरम केल्यानंतर अर्धा तासांनी डब्बा खाली घेऊन उघडला असता या डब्यात केवळ पिवळे पाणी आढळले. सोन्याचे दागिने त्या भामट्यांनी पळविल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत हे भामटे मात्र पसार झाले होते. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही महिलेने तक्रार दाखल केली नव्हती. भोकरदन : तालुक्यातील आव्हाना येथे बेकायदेशीर शंकरपटाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजक, व्यवस्थापक व सभासदांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.४गणपती पासायदिक शिवेश्वर जंगी शंकरपट या नावाने ६ ते ८ जानेवारी या कालावधीत बैलांना पळविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ती बेकायदेशीर असल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष कुऱ्हेवाड यांच्या फिर्यादीवरून शिरपतराव हिंगे, बाबूलाल कायटे, मानसिंग कायटे, बाबूलाल गुलाबसिंग कायट (रा. सर्व आव्हाना) व राजू मदांडे (येळगाव, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४याप्रकरणी पो.नि. रामेश्वर रेघे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सोने उजळून देतो म्हणून महिलांना लुटले
By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST