औरंगाबाद : चिकलठाणा लायन्स क्लबच्या अथक परिश्रमामुळे व लायन्स परिवाराच्या सामूहिक जबाबदारीमुळे लायन्स आय हॉस्पिटल एव्हरेस्टपदी पोहोचले आहे. भविष्यात ते दीपस्तंभाची जागा घेईल, असे गौरवोद्गार लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी रविवारी काढले. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अल्पावधीतच पूर्ण करण्याचे अभिवचनदेखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी इंटरनॅशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी म्हणाले, हे हॉस्पिटल मराठवाड्यातच नव्हे तर देशात अद्ययावत ठरेल. हॉस्पिटलसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक योगदान मिळावे, यासाठी सक्रिय प्रयत्न करावे लागतील. राजेश भारुका म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सध्या महिन्याला ५०० सर्जरी होत आहेत. या सर्जरी ७०० पर्यंत नवीन प्रकल्पामुळे होतील. मधुमेहासाठी प्रकल्प उभारला जावा, असा मानस प्रांतपाल एम. के. अग्रवाल यांनी व्यक्त केला. २०१७ पर्यंत हा प्रकल्प सर्वांच्या मदतीने पूर्ण होईल. हॉस्पिटलचे अध्यक्ष बी. एस. राजपाल म्हणाले, आजचा दिवस क्लबसाठी गौरव सोहळा आहे. आजवर दहा हजारांवर सर्जरी या हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. ७० टक्के आॅपरेशन नि:शुल्क करीत आहोत. नवीन प्रकल्पानंतर कार्यक्षमता वाढून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळेल. लायन्सचे उपप्रांतपाल संदीप मालू, पूर्व प्रांतपाल तनसुख झांबड, कोषाध्यक्ष संजीव गुप्ता, प्रकाश राठी, सुरेश बाफना, सावित्री बाफना, रवींद्र करवंदे, राजेश लहुरीकर, राजेंद्र लोहिया, एस. एम. अग्रवाल, पंकज फुलपगर, राजकुमार टिबडीवाला, विमल टिबडीवाला, रमेश पोखर्णा, हर्षवर्धन जैन, कांतीलाल कांकरिया, जी. एम. बोथरा, प्रसिद्धीप्रमुख अॅड. शांतीलाल छापरवाल, डॉ. बायस, पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गोठी, जयकुमार थानवी यांनी केले. आभारप्रदर्शन सचिव विनोद चौधरी यांनी केले. हॉस्पिटलच्या नवीन प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लायन्स परिवाराच्या सक्रिय योगदानातूनच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. त्यामुळे सर्वांनी प्रकल्पासाठी सक्रिय असे योगदान द्यावे, असे आवाहन भूमिपूजनप्रसंगी करण्यात आले.
लायन्स परिवार सामूहिक जबाबदारीमुळेच यशस्वी
By admin | Updated: June 13, 2016 00:44 IST