वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा घसरगुंडी खेळताना पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मुलीचा अचानक अंत झाल्याने जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.गोविंद आसाराम जाधव हे आई, पत्नी व ३ मुलांसह अयोध्यानगर येथे राहतात. त्यांना प्रथमेश (९), ओंकार (७) व ज्ञानेश्वरी (४) ही अपत्ये. ज्ञानेश्वरी बुधवारी सायंकाळी भाऊ ओंकारसह आजी मीराबाई यांच्यासोबत देवगिरीनगर येथील सिडको उद्यानात खेळण्यासाठी गेली. उद्यानात (पान २ वर)ज्ञानेश्वरीच्या मृत्यूनेजाधव कुटुंबाला धक्काघरात सर्वात लहान असल्याने ज्ञानेश्वरी सर्वांची लाडकी होती. तिच्या खेळण्या- बागडण्याने घर फुलून जात होते. पण खेळता खेळता अचानक ज्ञानेश्वरीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबियांना धक्का बसला. या घटनुमळे त्यांचे शेजारीही दु:खी झाले आहेत.ज्ञानेश्वरीला यंदा अंगणवाडीत घालायचे असल्याने तिच्यासाठी तिच्या आवडीचे नवीन कपडे, बूट, स्कूल बॅग, वॉटर बॅग खरेदी करून ठेवली असल्याचे सांगताना तिचे वडील गोविंद जाधव यांना अश्रू अनावर झाले होते.
आयुष्याचीच घसरगुंडी!
By admin | Updated: June 11, 2016 00:18 IST