शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

वडगाव परिसरात बिबट्या?

By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST

वाळूज महानगर : साजापूरपाठोपाठ काल रात्री वडगाव परिसरात बिबट्या अवतरल्याच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

वाळूज महानगर : साजापूरपाठोपाठ काल रात्री वडगाव परिसरात बिबट्या अवतरल्याच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरास भेट देऊन हा बिबट्या नसून तरस असल्याचा दावा केला आहे.पंधरा दिवसांपूर्वीच साजापूर शिवारातील गट नंबर ६५ मध्ये वीटभट्टीवर मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे मजूर तसेच साजापूरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी वीटभट्टीवरील मजूर बबन खंडागळे, भगवान पवार, राजू गायकवाड व अन्य ८ ते १० मजुरांनी बिबट्या दिसल्याचा दावा केला होता. या वीटभट्टीवरील माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्या व त्याचा लहान बछडा जवळपास अर्धा तास थांबल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी साजापूरचे उपसरपंच सय्यद कलीम यांनी दौलताबादच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, काल १७ डिसेंबरला वडगाव शिवारातील गट नंबर ६६ मध्ये गजानन कटारे यांना बिबट्या दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या भागात बिबट्या दिसल्यामुळे माजी उपसरपंच कृष्णा साळे व नागरिकांनी दौलताबादच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खातरजमा करण्याची मागणी केली होती.