उस्मानाबाद : जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सुमारे ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेच्या उमेदवारांचाही समावेश आहे. जिल्हा बँकेचा निवडणूक आखडा चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच पक्षांकडून प्रबळ उमेदवारांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे (रा. धानुरी), महिला राखिव मतदार संघातून शेळगाव येथील पुष्पाताई सुभाषराव मोरे, श्रावण आर्जुनराव सावंत सौंदाणा (ढोकी), शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर रावसाहेब पाटील (परंडा), रणजीत ज्ञानेश्वर पाटील (परंडा), आशोकराव लक्ष्मणराव शिंदे (वाकडी), विजेंद्र विश्वनाथ चव्हाण (बोर्डा), काँग्रेसचे नितीन केशवराव बागल (उस्मानाबाद), काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास जगदेवराव शिंदे (उस्मानाबाद, दोन अर्ज), नारायण किशनराव समुद्रे (ढोकी), काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण खामकर (तेरखेडा, दोन अर्ज), विद्यमान संचालक सुनील चव्हाण (अणदूर), संजय गौरीशंकर देशमुख (कामेगाव, दोन अर्ज), काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत चेडे (वाशी), रंजना अजित पिंगळे (पाथरडी), निळकंठ भगवान भोरे (जांब), नारायण किशनराव समुद्रे (ढोकी), श्रावण अर्जुनराव सावंत (सौंदाणा ढोकी), राष्ट्रवादीचे सतीश दंडनाईक (उस्मानाबाद), रमेश उत्तमराव पाटील (इंदापूर), किरण भाऊसाहेब पाटील (देवळाली), प्रतिभा शिवाजीराव पाटील (कडकनाथवाडी), राष्ट्रवादीचे मनोगत रत्नाकर शिनगारे (खामगाव, चार अर्ज), शिवाजी यशवंतराव नाईकवाडी (तेर), त्रिंबक तुळशीराम कचरे (मस्सा खं. दोन अर्ज) आणि पारगाव येथील ताराचंद पन्नालाल डुंगरवाल यांचा समावेश आहे.जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० एप्रिलपर्यंत मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी तब्बल ३० नामनिर्देशनचत्रे दाखल झाली आहेत. उमेदवारी दाखल करण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सदरील दोन दिवसांमध्ये सर्वचच पक्षाची मात्तबर नेतेमंडी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
दिग्गज आखाड्यात !ं
By admin | Updated: April 9, 2015 00:12 IST