शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

लाखो भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन

By admin | Updated: April 23, 2016 01:23 IST

खुलताबाद : श्रद्धास्थान असलेल्या येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

खुलताबाद : श्रद्धास्थान असलेल्या येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी भद्रा मारुतीचा जयघोष केल्याने खुलताबादनगरी शुक्रवारी दुमदुमली. जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ बारगळ, सचिव कचरू बारगळ यांच्यासह विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच हजारो भाविक पायी खुलताबादकडे येत होते. रात्री दहा वाजेनंतर भाविकांचे जथेच्या जथे जय भद्राचा जयघोष करीत खुलताबादनगरीत दाखल होत होते. पायी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणीचहापाणी, फराळाची व्यवस्था विविध सेवाभावी संस्था, संघटनांतर्फे करण्यात आली होती. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. औरंगाबादहून मोठ्या संख्येने पायी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली होती. हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुती संस्थान येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. कैलासगिरी महाराज,( गिरी आश्रम सावखेडा, ता. गंगापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.दिवसभर भाविकांची गर्दी...भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हार, पानफूल, नारळाची यावर्षी विक्रमी विक्री झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून दर्शन रांगेत मंडप टाकण्यात आला होता. दर्शन व्हावे म्हणून संस्थानचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत होते.