केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे परत घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी मोठ्या संख्येने दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, या देशात लोकशाही नांदत आली आहे. संविधान सर्वश्रेष्ठ आहे. हिटलरशाही अजिबात चालणार नाही. केंद्र शासनाला काळे कायदे परत घ्यावेच लागतील. आज करण्यात आलेले आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे असले तरी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॅप्शन.. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले किसान बाग आंदोलन.