औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत कम्बाईन बँकर्स आणि महावितरण संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. शैलीदार फलंदाज मिलिंद पाटील आणि संजय बनकर सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महावितरणविरुद्ध इंडो जर्मन टूल रूमने २0 षटकांत ८ बाद १२0 धावा केल्या. त्यांच्याकडून ज्ञानेश्वर ठोंबरे २ चौकारांसह ३८, सुशील नाईकने २६ व दीपक जगतापने २0 धावा केल्या. महावितरणकडून कैलास शेळकेने १६ धावांत २ गडी बाद केले. त्याला अक्रम सय्यद व संजय बनकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात महावितरणने विजयी लक्ष्य १८.३ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून संजय बनकरने १४ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. अतिक खानने ११ चेंडूंत एक षटकार व २ चौकारांसह नाबाद २0 व सचिन पाटीलने १६ धावा केल्या. इंडो जर्मन टूल रूमकडून देवेश कुमारने १८ धावांत २, तर पवन भालेराव व मनोज भाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत मनपाविरुद्ध कम्बाईन बँकर्सने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ३ बाद २00 धावा ठोकल्या. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज मिलिंद पाटीलने चौफेर टोलेबाजी करताना ५२ चेंडूंतच एक षटकार व ११ सणसणीत चौकारांसह नाबाद ७९ धावा ठोकल्या. त्याला तोडीची साथ देणाºया राजेश कीर्तीकरने ५0 चेंडूंत ४ षटकार व ८ चौकारांसह ७३ धावांची झंझावाती खेळी केली. गौरव गंगाखेडकरने १३ चेंडूंत नाबाद १९ धावा केल्या. मनपाकडून अकीब जावेदने ३९ धावांत २ व संतोष शेळकेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मनपाचा संघ २0 षटकांत ८ बाद ९५ धावाच करू शकला. त्यांच्याकडून कर्मवीर लव्हेराने एकाकी झुंज देताना ४८ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ४२ धावा केल्या. राम प्रधानने ११ धावांचे योगदान दिले. इनायत अली, श्याम लहाने व महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. संदीप राजपूत व निखुल मुरूमकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
कम्बाईन बँकर्स, महावितरण उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:55 IST
गरवारे क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत कम्बाईन बँकर्स आणि महावितरण संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. शैलीदार फलंदाज मिलिंद पाटील आणि संजय बनकर सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
कम्बाईन बँकर्स, महावितरण उपांत्य फेरीत
ठळक मुद्देटी-२0 : मिलिंद पाटील, संजय बनकर सामनावीर