लातूर : साखरा पाटीनजीक एका प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी बालाजी गोडसेसह अन्य दोघे अशा तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़ आता एकूण सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले.साखरा पाटीनजिक एका प्रेमीयुगुलाला जबर मारहाण झाली होती. या प्रकरणी सर्व स्तरातून निषेधही नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या मुख्य आरोपी बालाजी गोडसे तसेच राकेश गोडसे, अक्षय बनसोडे यांची पोलिस कोठडी २६ जानेवारीला संपली. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. तर यापूर्वी अमोल खंदाडे, नितीन गोडसे, संदीप गोडसे हेही न्यायालयीन कोठडीत आहेत़ बहुचर्चीत झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा अरोपींना अटक केली. पहिल्या टप्प्यात तीन आणि दुसऱ्या टप्प्यात तिघांचा समावेश होता़ हे सर्व न्यायालयीन कोठडीत असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
प्रेमीयुगुल मारहाण प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST