औरंगाबाद : सकल मारवाडी युवा मंचतर्फे एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय जैन्युईन सकल मारवाडी क्रिकेट स्पर्धेत जांगीड इलेव्हन संघाने यारा इलेव्हन संघावर ८ धावांनी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यांत अग्रसेन स्पार्टन संघाने शिखवाल इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली.जांगीड इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ९.४ षटकांत सर्वबाद ६७ धावा केल्या. त्यांच्याकडून सूरज सुलानेने ११ व गोपाल पहाडेने १६ धावा केल्या. अन्य फलंदाजांनी निराशा केली. यारा संघाकडून आदित्य डी. याने १५ धावांत ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यारा इलेव्हन १० षटकांत ६ बाद ५९ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून एस. समाधान याने १९ चेंडंूत ३ चौकार खेचत सर्वाधिक ३१ धावा काढल्या. जांगीड संघाकडून सूरज सुलानेने १ धावेत २ बळी घेतले.दुसºया लढतीत शिखवाल इलेव्हनने १० षटकांत ५ बाद ६० धावा उभारल्या. त्यांच्याकडून गणेश एस.ने १६ धावा केल्या. अग्रसेनकडून प्रदीप व विनीतने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात अग्रसेन स्पार्टन संघाने ८.३ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून पीयूष बगाडियाने १०, मयंक तायलने १४ धावांचे योगदान दिले. शिखवाल इलेव्हनकडून अनिल पंडितने २ बळी घेतले.
जांगीड इलेव्हन उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST