बीड : स्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी आता जिल्ह्यात वर्षभर जागर होणार आहे. त्यासाठी 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहीमेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बालिका जन्मोत्सव भरविला जाणार आहे, अशी माहिती लेक लाडकी अभियानच्या अँड. वर्षा देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात अल्पवयीन विवाह, कुषोषण, शाळाबाह्य मुली, छेडछाड असे विविध प्रश्न आहेत. काही महिलांच्या अत्याचाराची नोंद होत नाही. नोंद झाली तर शिक्षेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता प्रभावी उपाय हवेत, असेही अँड. देशपांडे यांनी सांगितले. २६ जानेवारीला गावागावात होणार्या ग्रामसभेतून स्त्री जन्माच्या स्वागताचे ठराव घेतले जाणार आहेत. ग्रामआरोग्य व पोषण समित्यांच्या मदतीने आता महिला जन्माचे स्वागत होण्यासाठी कृतीआराखडा तयार आहे. या कार्यक्रमांचा समावेशस्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती सर्वदूर पोहोचविण्यात येणार आहे. सासू- सून मेळावे, स्त्री- पुरुष समानता, स्त्री जन्माचे स्वागत, गरोदर मातांना गर्भलिंगनिदान चाचणी न करण्याची शपथ घेणे, गावांमध्ये आकडे बोलतात अशी पाटी लावून स्त्री, पुरुष जन्मदाराच्या नोंदी करणे, एक किंवा दोन आपत्यांवर थांबणार्या माता- पित्यांचा गौरव करणे, मुलींसाठी रांगोळी, एकाच बाळावर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अधिकार्यांची कार्यशाळा ■ 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहिमेंतर्गत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा झाली. जिल्हाधिकारी राम, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सीईओ नामदेव ननावरे, सीएस डॉ. अशोक बोल्डे, डीएचओ डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी, डेप्युटी सीईओ एन. ए. इनामदार यांची उपस्थिती होती. अँड. वर्षा देशपांडे यांनी मार्गर्शन केले