शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच

By admin | Updated: March 29, 2016 00:38 IST

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आ. अर्जुन खोतकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट सोमवारी घेतली. त्यानंतर लोचन यांनी निविदा प्रक्रियेस मंजुरी दिली. या निर्णयाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जीर्ण झाल्याने तसेच नवीन वसाहतीतही जलवाहिनीअभावी पाणीप्रश्न बिकट झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून हे काम मंजूर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा करत या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याची योजना मंजूर करण्यात आलेली आहे. प्रारंभी १७७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. यात शहरात जलमापक बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने ही योजना १२७ कोटी ६५ लाख रुपयांवर मंजूर करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत शहरातील कादराबाद, रामनगर, चंदनझिरा, नुतन वसाहत, नागेवाडी, नॅशनलनगर, संभाजीनगर, बाजारवाडी (जुना जालना) या भागांत आठ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शहरात ३८१ कि़मी. लांबीची पाणी पुरवठा करणारी वाहिनी विविध भागांत अंथरण्यात येणार आहे. तर जलकुंभ ते अंतर्गत जलवाहिनी यांना जोडणारी ३० कि.मी. लांबीची मोठी जलवाहिनी बसविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ४८ कोटी ४९ लाख २२ हजार रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया मंजुरीअभावी योजनेची अंमलबजावणी रखडली होती. यासाठी आ. अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया मंजूर करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर लोचन यांनी योजनेची परिपूर्ण माहिती घेत याची निविदा प्रक्रिया तात्काळ मंजूर केली. या निर्णयाने शहरातील अनेक वर्षापासून रखडलेला जलवाहिनीचा प्रश्न निकाली निघणार आहे. ही योजना मंजूर करण्यापासून ते निविदा प्रक्रियेपर्यंतच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले तर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)