शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

राजकीय समीकरणे बदलण्याच्या आशेवर इच्छुक

By admin | Updated: September 20, 2014 00:03 IST

हिंगोली : भाजपाशी असलेली युती तुटलीच तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी असावी यासाठी आज बैठक घेण्यात आली.

हिंगोली : भाजपाशी असलेली युती तुटलीच तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी असावी यासाठी आज बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे या संभाव्य घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या राष्ट्रवादीच्या मंडळींचीही चाचपणी सुरू असल्याचे दिसते.गेल्या काही दिवसांपासून भाजपा व शिवसेनेत सुरू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आज निर्माण झाली होती. अजूनही परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे सेना व भाजपातील कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या वतीने तर आज हिंगोली विधानसभेच्या तयारीसाठी बैठकच घेण्यात आली. जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे रामेश्वर शिंदे, तालुकाप्रमुख कडूजी भवर, सेनगावचे संतोष देवकर, जि. प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, अशोक हरण, संपोष पोपळघट, डॉ. रमेश शिंदे, बबन नायक, भानुदास जाधव आदी उपस्थित होते. युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याचे व झाल्यास एकत्रितपणे काम केले जाईल, असे ठरविण्यात आले. तोपर्यंत भाजपाच्या कोणत्याच कार्यक्रमाला शिवसैनिक जाणार नसल्याचे ठरले.भाजपानेही जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्वीपासूनच सुरू असल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हाच कित्ता गिरविला होता. त्यामुळे हिंगोली व कळमनुरी या कॉंग्रेसकडेच असलेल्या मतदारसंघातही इच्छुक दिसत होते. कळमनुरीसाठीचा राष्ट्रवादीचा हट्ट लपून राहिलेला नाही. हिंगोलीच्या माजी खा. सूर्यकांता पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काही अफवा पसरल्या होत्या. त्यात माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. आता युती तुटल्यास आघाडीतही बिघाडी होईल, अशी अटकळ बांधली जाते. त्यामुळे चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील, असा अंदाज वर्तविला जातो. मात्र माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे पक्ष पातळीवरील वजनही लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय कळमुनरीत भाजपाला लढण्याची वेळ आलीच तर जगजीत खुराणा यांच्या नावाची अटकळ बांधली जात होती. मात्र खुराणा यांनी राष्ट्रवादीकडून मुलाखत दिली होती. राष्ट्रवादीत कळमनुरीसाठी अगोदरच इच्छुकांच्या रांगा आहेत. युती व आघाडीत बिघाडी झाल्यास संभाव्य लढतीचा आराखडा मांडणे यावरून अवघड आहे. वसमतसारख्या मतदारसंघात मात्र दिग्गज इच्छुकांना एक नवा मार्ग सापडणार आहे. कॉंग्रेस व भाजपाचा एक नवा पर्याय या इच्छुकांसमोर असेल. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेची डोकेदुखी कमी होणार असली तरी विभाजनाचे भूत मानगुटीवर बसणार आहे. कळमनुरी व हिंगोलीकरांना मित्र व स्पक्षाची बंडखोरी नवी नाही. हिंगोलीत तर बंडखोरीशिवाय सरळ लढत झाल्याचा मागील काही निवडणुकांचा इतिहास नाही. केवळ नवीन चिन्हांची ओळख म्हणून लोक त्याकडे पाहतील. वसमतला मात्र ही बाब निवडणुकीत रंग भरणारी ठरेल. (जिल्हा प्रतिनिधी)