बीड: असा कोणाताही दिवस नाही की त्या दिवशी महिला अत्याचाराच तक्रार दाखल होत नाही. जिल्ह्यातील मंगळवारी सात ठिकाणी विवाहित महिलांनी घरगुती अत्याचार झाला असल्याची तक्रार दिली. त्यावरुन त्या महिलांच्या घराच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली तक्रार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुत्तेदारी व्यवसाय वाढविण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी शेख खनिजा शेख रहीम यांच्या फिर्यादीवरुन शेख रहीम शेख अमीर, शेख आमीर शेख अफजल, शेख मुमताज शेख आमीर, शेख बशीर शेख आमीरख शेख तोहरीन शेख आमीर सर्व रा. मलिकपुरा परळी व शेख परवीन शेख अहमद रा. कळंब चौक, केज यांच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोसिल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. माहेरुन अॅपेरिक्षा खरेदीकरण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून छळ केल्या प्रकरणी माजलगाव तालुक्यातील माळेवाडी येथील अनिता प्रकाश थोरात यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश शेषेराव थोरात (नवरा), शेषेराव बाजीराव थोरात (सासरा), सरुबाई शेषेराव थोरात (सासू) सर्व रा माळेवाडी व मंदाकिनी गजानन जोगदंड (नणंद) रा एरंडेश्वर जि. परभणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. घर बांधण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये या कारणावरुन शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी शीतल भागवत आंधळे यांच्या फिर्यादीवरुन भागवत राम आंधळे व इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौथा गुन्हा पाटोदा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. किरणा दुकान टाकण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याच्यासाठी मारहाण व शिवीगाळ करुन जाच जुलूम केल्या प्रकरणी सबीना युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरुन युसूफ बन्सी शेख, गजराबी बन्सी शेख, शब्बीद बन्सी शेख, मुमताज बन्सी शेख इम्तियाज बन्सी शेख, शाहेद बन्सी शेख, जाफस बन्सी शेख व इतर एक सर्व रा. बी.आर.सी. कॉलनी चेंबूर, मुंबई यांच्या विरुद्ध पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचवा गुन्हा धारुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. माहेरुन चाळीस हजार रुपये व सोन्याची अंगठी का आणत नाहीस या कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देऊन घरातून हाकलून दिले. या प्रकरणी दीपाली भिसे यांच्या तक्रारीवरुन सतीश बळीराम भिसे, बळीराम भिसे, जिजाबाई बळिराम भिसे, सुरेखा गायकवाड व बालाजी गायकवाड सर्व रा. संघर्ष नगर चांदोली, मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहावा गुन्हा धारुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घर बांधण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्या प्रकरणी अश्विनी गव्हाणे यांच्या फिर्यादीवरुन हानुमंत मधुकर गव्हाणे, मधुकर बाबूराव गव्हाणे, सुनंदा मधुकर गव्हाणे सर्व रा. वाघोली ता. धारुर व अनुराधा नितीन गव्हाणे, नितीन करपे दोन्ही रा. केज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातवा गुन्हा वडवणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. माहेरुन घर बांधण्यासाठी एक लाख रु. घेऊन येण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी वर्षा चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन राजेभाऊ बबन चव्हाण, बबन चव्हाण, कौशल्या बबन चव्हाण व इतर एका रा. हरिश्चंद्र पिंपरी तांडा ता वडवणी , सविता रामेश्वर राठोड, रा. पाचेगाव ता. गेवराई व रंगनाथ राठोड रा. नित्रूड, माजलगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या तक्रारीत वाढ
By admin | Updated: June 26, 2014 00:35 IST