औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

By विकास राऊत | Published: April 27, 2024 02:59 PM2024-04-27T14:59:10+5:302024-04-27T15:04:17+5:30

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली.

In Aurangabad, 44 candidates including one national, four regional parties are in the fray, applications of 7 rejected | औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज छाननीअंती सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली. सात उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ४४ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांनी सूचकांची संख्या दिलेली नव्हती, त्यांचे अर्ज बाद झाले. उमेदवार अपक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष असेल, तर त्यांना १० सूचक लागतात. काही उमेदवारांनी कमी सूचक संख्या दिली होती. काही उमेदवारांनी सूचकांची नावे दिली, परंतु ते मतदारसंघातील नव्हते. तरीही सर्वांसमक्ष उमेदवारांना सूचकांबाबत संधी दिली होती. परंतु त्यांना दुरुस्ती करता आली नाही, असेही स्वामी यांनी सांगितले.

चार प्रादेशिक आणि बसपा या एकाच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर ३९ अपक्ष उमेदवार आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागल्यास प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी....................... कारण
- नंदा सुभाष मुके - भारतीय जवान किसान पार्टी...........................उमेदवार व सूचक म्हणून स्वत:चे नाव लिहिले
- श्रीराम बन्सीलाल जाधव - जय सेवालाल बहुजन विकास पार्टी.......सूचकांची नावे कमी होती.
- रंजन गणेश साळवे - इन्सानियत पार्टी................सूचकांची नाव मतदार यादीत नव्हती.
- शेख समीर शेख शफिक - सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया.........सूचकांची नावे कमी होती.
- सुरेश धोंडू चौधरी - अपक्ष..................सूचक कमी होते.
- सचिन रामनाथ मंडलिक - अपक्ष.............सूचक कमी होते
- रामनाथ पिराजी मंडलिक - अपक्ष.............सूचक कमी होते

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी...
चंद्रकांत भाऊराव खैरे, उद्धवसेना
संदीपान आसाराम भुमरे, शिंदेसेना
सय्यद इम्तियाज जलील, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
संजय उत्तमराव जगताप, बहुजन समाज पार्टी
हर्षवर्धन रायभान जाधव, अपक्ष
मनीषा खरात, बहुजन महाराष्ट्र पार्टी
खान एजाज अहमद, अपक्ष
सुरेश आसाराम फुलारे, अपक्ष
खाजा कासीम शेख, अपक्ष
बबनगिर उत्तमगीर गोसावी, हिंदुस्थान जनता पार्टी
किरण सखाराम बर्डे, अपक्ष
देवीदास रतन कसबे, अपक्ष
जगन्नाथ किसन उगले, अपक्ष
अरविंद किसनराव कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख, अपक्ष
रवींद्र भास्करराव बोडखे, भारतीय युवा जन एकता पार्टी
संजय भास्कर शिरसाट, अपक्ष
मोहम्मद नसीम शेख, अपक्ष
सुरेंद्र दिगंबर गजभारे, अपक्ष
साहेबखान यासिनखान पठाण, अपक्ष
गोरखनाथ राजपूत राठोड, अपक्ष
प्रतीक्षा प्रशांत चव्हाण, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष
जियाउल्लाह अकबर शेख, अपक्ष
जगन्नाथ खंडेराव जाधव, अपक्ष
वसंत संभाजी भालेराव, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
पंचशीला बाबूलाल जाधव, रिपब्लिकन बहुजन सेना
संगीता गणेश जाधव, अपक्ष
नितीन पुंडलिक घुगे, अपक्ष
नारायण उत्तम जाधव, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
मिनासिंग अवधेशसिंग सिंग, अपक्ष
प्रशांत पुंडलिकराव आव्हाळे, अपक्ष
मधुकर पद्माकर त्रिभुवन, अपक्ष
मनोज विनायकराव घोडके, अपक्ष
विश्वास पंडित म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
डॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत, अपक्ष
भरत पुरुषोत्तम कदम, राष्ट्रीय मराठा पार्टी
अर्जुन भगवानराव गालफाडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
संदीप देवीदास जाधव, अपक्ष
लतीफ जब्बार खान, अपक्ष
संदीप दादाराव मानकर, अपक्ष
अब्दुल समद बागवान, एआयएमआयएम (आयएनक्यू)
भानुदास रामदास सरोदे पाटील, अपक्ष

वंचितकडून दोन अर्ज ...
वंचित बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारी अर्ज आहेत. विशाल उद्धव नांदरकर आणि अफसर खान यासिन खान यांचे अर्ज वंचितकडून असले तरी खान यांच्या अर्जाला बी-फॉर्म आलेला आहे, असे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.

Web Title: In Aurangabad, 44 candidates including one national, four regional parties are in the fray, applications of 7 rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.