जालना : जाफराबाद तालुक्यातील सावगी वरगणे येथील ग्रामसेवक व्ही.एन. खरात यांना मारहाण केल्याची घटना ५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.खरात हे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना संशयित आरोपीने तेथे येऊन मुख्याध्यापक शाळेत शिकवत नाही त्यांना सांगा. तेव्हा खरात यांनी कामकाज संपल्यानंतर सांगतो असे म्हणताच त्याने शिवीगाळ करून खरात यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी टेभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)
ग्रामसेवकास मारहाण
By admin | Updated: August 6, 2015 00:03 IST