शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सरकारी व्हेंटिलेटर गेले आमदारांच्या कोविड सेंटरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांपाठोपाठ आता भाजप आमदारांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गेल्याचा प्रकार समोर आला ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांपाठोपाठ आता भाजप आमदारांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये सक्षम करण्याऐवजी सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींच्या रुग्णालयांसाठी देऊन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन मोकळे होत आहे. आरोग्य विभागाला म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि त्याअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागांतील सरकारी रुग्णालयांसाठी गेल्या वर्षभरात १३७ नवे व्हेंटिलेटर मिळाले. मात्र, यातील तब्बल ९० व्हेंटिलेटर इतरांना वाटून आरोग्य विभाग मोकळा झाला. या सगळ्यात ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा अभाव रुग्णांच्या जिवावर उठत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे गतवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी पीएम केअर फंडातून ९७ व्हेंटिलेटर मिळाले. त्याबरोबर सीएसआर फंडातून ५, सीएम कार्यालयाकडून १५ आणि हाफकिनकडून २० व्हेंटिलेटर मिळाले. तब्बल १३७ व्हेंटिलेटर प्राप्त झाले. त्यामुळे ग्रामीण भागांतील आणि उपजिल्हा रुग्णालये व्हेंटिलेटरच्या सुविधेने सुसज्ज होतील, अशी अपेक्षा होती; परंतु वर्ष उलटूनही ग्रामीण भागांतील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी शहरात धाव घ्यावी लागत आहे. १३७ पैकी केवळ ४७ व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्यातील काही व्हेंटिलेटर नादुरुस्त आणि नावालाच रुग्णालयात आहेत. तब्बल ७२ व्हेंटिलेटर घाटीला देण्यात आली, तर २६ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आली. त्यातील नंतर काही परत घेण्यात आली; परंतु १४ व्हेंटिलेटर अद्यापही खाजगी रुग्णालयांकडेच आहेत. हे सगळे होत नाही, तर आमदारांच्या कोविड सेंटरसाठी ४ व्हेंटिलेटर देण्यात आल्याचे समोर आले आहे.

लासूर स्टेशन येथे भाजप आ. प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वीच १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले. याठिकाणी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजननिर्मितीचा प्लांट आदी सुविधा आहेत. याठिकाणी हे सरकारी ४ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. ग्रामीण भागांतील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची गरज आहे; परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे.

-------

रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न

४ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. पडून असलेले व्हेंटिलेटर वापरून रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासोबत रुग्णालयात आमचेही व्हेंटिलेटर आहेत. याठिकाणी एम.डी. डाॅक्टर कार्यरत आहेत. सर्व प्रक्रिया करून, पत्रव्यवहार करून हे व्हेंटिलेटर मिळविले आहेत.

-आ. प्रशांत बंब

----

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ४ व्हेंटिलेटर लासूर स्टेशन येथील आ. प्रशांत बंब यांच्या कोविड केअर सेंटरसाठी देण्यात आले आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. ८ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. ती लवकरच दुरुस्त केली जातील. व्हेंटिलेटरची ही संख्या ३३ पर्यंत वाढविली जाईल.

-डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

----

आराेग्य विभागाचे १३७ व्हेंटिलेटर याठिकाणी

घाटी- ७२

एमजीएम रुग्णालय- १०

अजिंठा हाॅस्पिटल- २

सावंगीकर हाॅस्पिटल- २

कन्नड ग्रामीण रुग्णालय- २

पाचोड ग्रामीण रुग्णालय- ३

वैजापूर उपजिल्हा रुग्णालय- २

गंगापूर उपजिल्हा रुग्णालय- ४

लासूर स्टेशन सीसीसी- ४

पैठण हेल्थ युनिट- ३

जिल्हा सामान्य रुग्णालय- ३३