शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुुंबाला तात्काळ मदत द्या

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

लातूर : जिल्ह्यात शनिवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या दोन्ही गावात जबाबदार अधिकारी म्हणून स्वत: उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या

लातूर : जिल्ह्यात शनिवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या दोन्ही गावात जबाबदार अधिकारी म्हणून स्वत: उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत पोहोचवा, असे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्र्यांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख, आ. सुधाकर भालेराव, आ. संभाजीराव पाटील, आ. विनायकराव पाटील, आ. त्र्यंबक भिसे, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, महापौैर अख्तर शेख, विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. पाडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जि. प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मघमाळे, पोलिस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सांगितला. यानंतर चित्रफित दाखविण्यात आली. पुढे महसूलमंत्री खडसे म्हणाले की, नजर आणेवारीवरुन शेतकऱ्यांना ज्या निकषाखाली मदत करण्याची नियमावली आहे. त्यावरुन आधी तातडीने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली पाहीजे. प्रशासनाने यात हयगय करता कामा नये. शिवाय संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने चारा लागवडीला प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांची वीजेची गरज लक्षात घेऊन सहा ते आठ तास दिवसा त्यांना वीज देणे गरजेचे आहे. रात्री वीज देऊन काहीही फायदा होत नाही. त्यामुळे दिवसा अखंडीतपणे वीज देण्याच्या सूचना केल्या. गरज असेल त्या गावात विहीरी अधिग्रहण, नरेगाची कामे आणि पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी.