शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत इंधन भेसळ : अहवाल नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा ...

ठळक मुद्देपुरवठा विभाग : सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकरणात इंधन भेसळीबाबत तपासणी करण्याचा फार्स पुरवठा विभागाने केला; परंतु त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही.क्रांतीचौकातील पेट्रोल पंपावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्यामुळे दिवसभर पंपावर नागरिकांनी गदारोळ केला होता. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे त्या दिवशीचा तणाव निवळला होता; परंतु तेथील इंधन तपासणीचे नमुने पुरवठा विभागाने घेतल्यानंतर त्याची पुढे काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे भेसळयुक्त इंधन विकणारे पेट्रोल पंपचालक मोकाट असून, त्यांना पुरवठा विभागाकडून आश्रय मिळतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडे मंगळवारी एका नागरिकाने पाणीमिश्रित इंधन खिंवसरापार्कमधील साईशरण पेट्रोलपंपातून मिळाल्याची तक्रार पुरवठा अधिकाºयांकडे पुराव्यानिशी केली; परंतु इंधन खरेदीचे बिल नसल्यामुळे त्या नागरिकाची तक्रार घेतली गेली नाही. गेल्या महिन्यात भाजप पदाधिकाºयाच्या चारचाकी वाहनात पाणीमिश्रित डिझेल भरल्याची तक्रार पुढे आली होती.पुरवठा अधिकारी म्हणालेपुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांना क्रांतीचौकातील पेट्रोल पंपाबाबत चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, तेथील इंधन भेसळीच्या नमुन्यांचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. दोन महिने उलटले तरी अहवाल का आला नाही. यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.आणखी एक तक्रारदरम्यान, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल आल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी केली.यासंदर्भात या ग्राहकाने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनदरम्यान राज पेट्रोलपंप येथे दुचाकीत १ लिटर पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर घरी जाईपर्यंत गाडी अनेकदा बंद पडत होती. बुधवारी सकाळी गाडी चालू करून थोडे अंतर पुढे गेल्यावर बंद पडत होती. अखेर मेकॅनिककडे गाडी नेली. त्यांनी गाडीच्या टाकीतील सर्व पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरले असता. त्यात ७० टक्के पाणी तर ३० टक्के पेट्रोल तरंगत असल्याचे आढळून आले. ती बाटली घेऊन मी राज पेट्रोलपंपवर गेलो तेव्हा तेथील व्यवस्थापक युसूफभाई उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून गेले. मात्र, मी पुन्हा सायंकाळी पेट्रोलपंपवर तीच बाटली घेऊन गेलो तेव्हा त्यांनी इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाणी होत असल्याचे कारण सांगितले.यासंदर्भात युसूफभाई यांना विचारणा केली असता पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर आम्ही आमच्या सर्व पंपांवरील पेट्रोलची तपासणी केली. मात्र, तसे आढळून आले नाही.कंपनीच्या विक्री व्यवस्थापिका अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते, पेट्रोल टाकीत पाणी झाले की, बाईक सुरूकरण्यास त्रास होतो. यासंदर्भात आज पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली.जालना रोडवरील राज पेट्रोल पंपावर ग्राहकाने तक्रार करताना दाखविलेली हीच ती बाटली. दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढले असता त्यात पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचे आढळून आले. पाणी खाली त्यावर पेट्रोल तरंगत होते. तसेच पेट्रोलपंप व्यवस्थापकाने काचेच्या परीक्षण नळीत अगोदर पाणी टाकले व त्यावर पेट्रोल टाकले. हळूहळू पेट्रोलचे रूपांतर पाण्यात होईल, असे हा व्यवस्थापक म्हणाला.पेट्रोलपंपचालकांची जनजागृती मोहीमपेट्रोलपंप संघटनेचे अकील अब्बास यांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीसाठी आणत आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल टाकले जात असे आता १० टक्के इथेनॉल टाकले जाते. पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या आहेत. यासंदर्भात आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत.