शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

मित्रपक्षांनीच उठवला रिपाइंचा फायदा

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला.

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहिलो. पक्षाची राज्यात सत्ता आली. आमची मते मित्रपक्षांना जातात, मात्र मित्रपक्षांचा फायदा आम्हाला होत नसल्याची खंत खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. शुक्रवारी आठवले यांनी तुळजापूर येथे रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य सरचिटणीस राजा सरवदे, राज्य चिटणीस संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनाच आम्ही प्रामाणिकपणे मतदानही केले. मात्र, मित्रपक्षांची मते त्या तुलनेत आम्हाला मिळाली नसल्याची खंत व्यक्त करीत पुण्यातील चंद्रकांता सोनकांबळे तसेच इतर काही जागांवर रिपाइं उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले आहेत. भाजपाकडून थोडीशी रसद मिळाली असती तर येथे विजय मिळाला असता, असेही ते म्हणाले. येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आश्वासन दिल्याप्रमाणे रिपाइंला दहा टक्के वाटा मिळेल, अशी आशा असल्याचे सांगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपाकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येत्या २८ रोजी मुंबई येथे पक्षाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत असून, नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा. तेथील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, नगर जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या बरखास्त कराव्यात, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यात होत असलेले अत्याचाराचे प्रकार घृणास्पद असल्याचे सांगत जवखेड्यातील घटनेनंतर जामखेड येथे कैैकाडी समाजातील बाळू माने याची हत्या झाली आहे. सदर अत्याचार थांबविण्यासाठी गृह विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली. बैठकीला जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विद्यानंद बनसोडे, भालचंद्र कठारे, रणजीत मस्के, किशोर वाघमारे, मंगेश सुकाळे, शहाजी सोनवणे, विनायक वाघमारे, सिध्दार्थ शिंदे, आकाश बनसोडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)