शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सेंद्रीय शेतीतून फुलविली आंब्याची बाग

By admin | Updated: June 11, 2014 00:33 IST

प्रकाश मिरगे , जाफराबाद सेंद्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून नळविहरा (ता. जाफराबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय मोरे यांनी केशर आंब्यांची बाग फुलविली आहे.

प्रकाश मिरगे , जाफराबादसेंद्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून नळविहरा (ता. जाफराबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय मोरे यांनी केशर आंब्यांची बाग फुलविली आहे. एवढेच नव्हे तर अंतर्गत पीक म्हणून सीताफळाची लागवड केली असून, सीताफळाची बागही आता बहरात आली आहे. जाफराबाद तालुक्यात शेतीचे तंत्रज्ञान फारसे विकसीत नाही. येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करत आले आहेत. मात्र, संजय मोरे या प्रगतीशील शेतकऱ्याने विविध ठिकाणचा अभ्यास करून वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत खडकाळ तसेच माळरानावर आंबा तसेच सीताफळाची बाग फुलविली आहे.मोरे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा मानस केला. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणाचा अभ्यास केला. अंबडसह जिल्ह्यातील इतर भागांमध्येही केशर आंब्यांचे उत्पादन घेण्यात आले. त्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली. त्यामुळेच त्यांनी ९ वर्षांपूर्वी आपल्या शेतात सुमारे साडेतीन हजार आंब्यांची लागवड केली. त्यात प्रामुख्याने गांडूळ खतांसह सेंद्रीय खतांचाच वापर केला. खते, पाणी आणि औषधांची फवारणी करत झाडांची योग्य निगा राखली. तब्बल नऊ वर्षे ती बाग जिवापाड जपली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, केशर आंब्यांचे मोठे उत्पादन हाती आले आहे. विशेषत: आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा उपयोग न करता शेतातीलच पंपहाऊसमध्ये हे आंबे पिकविण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्णपणे नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे ग्राहकांना मिळत आहेत. गावरान आंबा फारसा उपलब्ध नसल्यामुळे केशर आंब्याला बाजारामध्ये विशेष मागणी आहे. केशर आंब्याच्या फळबागेसोबत अंतर्गत पिक म्हणून सीताफळाचीही लागवड केली. या बागेलाही मोहर आला आहे. या हंगामात सीताफळातूनही चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात दळणावळणाच्या साधनांअभावी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना स्वत: मार्केटिंंग करावी लागत आहे. तरीसुद्धा तालुक्याचा केशर आंबा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम संजय मोरे व हरिश मोरे यांनी केले आहे.एकाच जागेवर पाच कलमा एकत्र करून एक खोड तयार केले आहे. या वर्षात अवकाळी पावसाने वेळोवेळी हजेरी लावून या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही मेहनत आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर विक्रमी उत्पादन होत आहे. कृषी विभागाच्या वतीने खरपुडीत प्रदर्शनादरम्यान मोरे यांच्या केशर आंबा स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.