लातूर : तालुक्यातील ममदापूर पाटी येथे एटीएसच्या पोलिस उपनिरीक्षकांनी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीजवळील हिरव्या रंगाचा ओलसर पाच किलो गांजा पकडला. त्याच्या जवळील गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीस अटक करून लातूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.बीदर जिल्ह्यातील केशव तांडा येथील केशव भीमा पवार हा पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन ममदापूर पाटी येथून जात होता. कापडी पिशवीत तोंड बंद केलेल्या प्लास्टिक बॅगमध्ये त्याने गांजा ठेवला होता. विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेला गांजा एटीएस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक दगडू कदम यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी केशव भीमा पवार यास ताब्यात घेऊन लातूर ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून केशव पवार याच्याविरूध्द एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पाच किलो गांजा पकडला
By admin | Updated: July 8, 2014 00:58 IST