जालना : शेतीच्या वादातून मुलाने पित्यास तीक्ष्ण हत्याराने मारून त्याचा खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंप्री येथे ५ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास १० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.याबाबत मजुरी काम करणारे संजय छबुराव हिवाळे (वय ३३) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामभाऊ नबाजी साबळे (वय ५८) यांना त्यांचा मुलगा सुरेश याने आपली शेती बटईने का देतो, असे म्हणून शिवीगाळ करून लाकडी काठी व तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले. विटकरीने मारहाण करून रामभाऊ यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयतास घरातून फरफटत बाहेर ओढत नेऊन रस्त्याच्या बाजूला टाकले. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश रामभाऊ साबळे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.
गुरुपिंप्री येथे शेतीच्या वादातून पित्याचा खून
By admin | Updated: May 7, 2015 00:54 IST