-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कारागृहातील कैद्यांना पॅरोल दिला आहे. हे कारागीर कैदी अद्याप परतले नाहीत त्यामुळे उद्योग विभाग सध्या बंद आहे. मात्र पैठणच्या खुल्या कारागृहातील शेती उद्योग मात्र सुरू आहे. तोच भाजीपाला कारागृहात किचनमध्ये शिजवला जातो. हजारो जणांचे दोन वेळचे जेवण त्यातून तयार होते.
कारागृहात कैद्यांमार्फत तयार करण्यात येणारे फर्निचर, कापड आणि त्यापासून विविध प्रकारचे तयार कपडे, लोखंडी साहित्य, घर सजावटीच्या वस्तू यास मोठा ग्राहक आहे. परंतु कोरोनामुळे सर्वच कारागृहातील इंडस्ट्री शासनाने बंद केलेली असून कैद्यांना पॅरोल दिला आहे.
पैठणच्या खुले कारागृहातील कृषी उद्योग, व्यवसाय जोरात सुरू असून येथे जवळपास ४० कैदी कामावर आहेत. त्यांच्यामार्फत शेतीतून पिकविण्यात येणारा भाजीपाला कारागृहात किचनमध्ये पाठवला जातो. इतर कैदी पॅरोलवर गेले असून ते अद्याप परतलेले नाहीत.
-जिल्हा कारागृहात एकूण कैदी
१,१५९
-पॅरोलवर गेले कैदी
७००
-पॅरोलवर नको रे बाबा!
कोरोना काळात उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले. शासनाने लादलेल्या नियमामुळे बहुतांश कैदी पॅरोलवर गेले आहे. पण शेती व्यवसाय करणारे कैदी कामावर असून त्यांचे शेती व्यवसाय कामे त्याप्रमाणे सुरळीत सुरू आहे.
-काय काय बनवले जात होते
-लाकडी फर्निचरचे उत्कृष्ट साहित्य
-लोखंडापासून तयार करण्यात येणारे अवजारे
-कापडी बॅग, सतरंजी, इतर कापडी तयार कपडे
-घर सजावटीच्या वस्तू
-कागदी फाईल फोल्डर
कोरोना काळात उत्पन्न बुडाले...
कोरोना उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कारागृहातील उद्योग व्यवसायातून कैद्यांना मिळणारा रोजगार बुडाला आहे. तर दुसरीकडे शेती व्यवसायातून जेमतेम उत्पन्न सुरू आहे त्यातून किती फायदा झाला हे सांगता येत नाही.
कारागृह प्रमुखाचा कोट..
शेती व्यवसाय आमच्याकडे नाही, परंतु कारागृहातील उद्योग इंडस्ट्री सर्व बंद असून गेलेले कैदी कडक नियमामुळे त्यांच्या रजा वाढत आहेत. कुशल कारागीर असलेले कैदी शासनाने दिलेल्या आदेशानंतर परत येतील. उद्योग व्यवसाय तेव्हा सुरू होईल. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूला शहरातून चांगली मागणी आहे.
-जयंत नाईक (मध्यवर्ती कारागृह प्रमुख, औरंगाबाद)
(डमी स्टार ९१०)