जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीकडून पुरेशी माहिती पोहोचत नसल्याने शेतकरी या योजनेबाबत संभ्रमात आहेत.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेपर्यंत माल बाजार समितीत ठेवून त्यावर नाममात्र व्याजदर आकारून शेतकऱ्यांना मालावर तारण कर्ज देण्याची शासनाची योजना आहे. परंतु त्यासाठी शासनाच्या अनेक जाचक अटी आणि क्लिष्ट पद्धतींमुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्याऐवजी आपला माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकतात. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्यांना शेती उत्पन्नासंबंधी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एक वर्ष दुष्काळ तर मागील वर्षी गारपिट यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात मोठी घट आली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पन्न घटणार आहे. एकीकडे शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्यांना तारण कर्ज देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मागणी केलेल्या १ कोटींच्या कर्ज रक्कमेपैकी २५ लाखांची रक्कम मिळाली. परंतु अचानक पणन महामंडळाने ही योजना स्टार कृषी या कंपनीमार्फत चालविण्याचे आदेश दिल्याने त्यापुढे बाजार अद्याप बाजार समितीला मिळाले नाही. तारण कर्ज योजनेबद्दल काहीच माहिती बाजार समितीकडून मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने माल विक्री केला. (प्रतिनिधी)२०१२-१३ या वर्षात राज्य शासनाने तारण पीककर्ज योजना स्टार कृषी कंपनीकडे हस्तांतरण करण्याच्या सूचना आम्हाला मिळाल्या. शासनाकडून १ कोटींपैकी २५ लाखांची रक्कम प्राप्त झाली होती. मात्र त्याचे वितरण झाले नसल्याची माहिती पणन महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
तारण योजनेबद्दल शेतकरी संभ्रमात
By admin | Updated: October 30, 2014 00:26 IST