शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिल्या सुविधा

By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST

परभणी: जिल्हा पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी घेतली जात असून, प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

परभणी: जिल्हा पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी घेतली जात असून, प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.१४४ पदांसाठी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कागदपत्र तपासणी पूर्ण झाली असून, १५ जूनपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी ४०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यापैकी ३७६ उमेदवार उपस्थित झाले.या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी ६ ते ८ या वेळेत उमेदवारांची पाच कि. मी. अंतराची धावण्याची चाचणी घेतली जात आहे. तसेच दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर लांब उडी, गोळा फेक, पूल अप्स आणि १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जात आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पोलिस प्रशासनाने योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या आहेत. वैद्यकीय व्यवस्थेबरोबरच दूध व केळी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदान शारीरिक चाचणी घेण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला तो या चाचणीसाठी तयार आहे काय? त्याला काही आजार आहे काय, याची विचारणा करण्यात येत आहे. भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून उमेदवार येथे दाखल झाल्यामुळे त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था पोलिस प्रशासनाने केली असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)उमेदवारांना आवाहनपोलिसात भरती करुन देतो, माझी अधिकाऱ्यांशी ओळख आहे, गुण वाढवून देतो, भरतीमध्ये तुला अडचण येऊ देत नाही, अशा अमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोल्सि अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.व्हिडीओ चित्रीकरणभरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक क्षणाचे व्हीडीओ चित्रीकरण करुन घेतले जात आहे. उमेदवारास त्याच्या अपात्रतेबाबत लेखी पत्रक देऊन तो अपात्र का झाला, याबाबत स्पष्ट उल्लेख या पत्रात केला जात आहे.भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना लायन्स क्लब परभणी प्रभावती, संजीवनी मित्र मंडळ, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन या सारख्या संस्थांनी देखील अल्पोहाराची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत अल्पोहार दिला जाणार आहे. तसेच पोलिस प्रशासनाने देखील सुविधा उपलब्ध केल्या आहेत.