शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

‘एक्स्प्रेस वे’ झाला खडतर

By admin | Updated: August 2, 2014 01:44 IST

नजीर शेख, औरंगाबाद नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

नजीर शेख, औरंगाबादनागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. रस्त्याचे काम करण्याची गती पाहता आणखी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एखादे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण न होणे यातून राज्याच्या रस्ते विकासाची दशा आणि दिशा स्पष्ट होत आहे. नागपूर ते मुंबई हे अंतर कमी करण्याच्या हेतूने तसेच नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाची सुरुवातही मोठा गाजावाजा करून झाली. नागपूर ते मुंबई अंतर ५० कि. मी. ने कमी करण्याचे उद्दिष्ट या रस्त्याची योजना मार्गी लावताना ठेवण्यात आले. १९९९ मध्ये या रस्ते कामाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम २००२ मध्ये सुरूझाले. २०१५ अखेर हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र २०१४ पर्यंत केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०१५ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची खात्री देता येत नाही. चौपदरी पूर्ण रस्ता केव्हा होणार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देता येत नाही. अजून तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल, असे औरंगाबादमधील राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणेआहे. राज्य रस्ते महामंडळाची उदासीनता आणि राजकीय व वाहतूक क्षेत्राकडून आग्रह न झाल्याने या रस्त्याच्या कामाचा पुरता बोऱ्या वाजला आहे.राज्याच्या तीन महत्त्वाच्या शहरांसह मराठवाडा तसेच विदर्भाला मुंबईशी वेगाने जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने मराठवाडा आणि विदर्भावर अन्यायच झाला आहे. नागपूर ते बुटीबोरी, जालना ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते लासूर स्टेशन या तीन टप्प्यांचेच फक्त चौपदरीकरण झाले आहे. इतर ठिकाणी हा रस्ता दुहेरीच आहे. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पुलांची कामे बाकी आहेत. विदर्भातील कारंजा, सिंदखेडराजा आणि मराठवाड्यातील वैजापूर या परिसरात हा रस्ता अनेक कि. मी. अजूनही एकेरीच आहे. असे असूनही या रस्त्यावर शहर विकासाच्या नावावर टोल सुरू करून राज्य शासनाने एकप्रकारे जनतेची लूटच चालविल्याचा हा प्रकार आहे.दोन तासांचा अवधी कमी होणारनागपूर ते मुंबई असा हा मार्ग राज्याच्या १२ जिल्ह्यांतून जातो. हा राज्यमार्गच आहे; परंतु याचा दर्जा राष्ट्रीय महामार्गाचा आहे. नागपूर - मुंबई हे अंतर ५० कि. मी. ने कमी होणार असले तरी हा रस्ता चौपदरी (फोर लेन) असल्याने वाहनांना वेगाने अंतर कापणे शक्य होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पेक्षा या रस्त्याने सुमारे दोन तासांचा अवधी कमी लागणार आहे. मात्र, हा उद्देश अद्यापपर्यंत सफल झालेला नाही. १९९८ साली राज्य रस्ते महामंडळाने ‘मुंबई - पुणे या एक्स्प्रेस वे’ चे घेतलेले काम २००२ साली पूर्ण झाले.याठिकाणी वेगाने काम झाले. २००५ साली ‘मुंबई - नाशिक या एक्स्प्रेस वे’ चे काम सुरू होऊन व दोन वेळा मुदतवाढ मिळूनही २०१३ साली जवळपास पूर्ण झाले.या दोन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण पाहता या रस्त्यांचे काम वेगाने होणे गरजेचे होते. असे असले तरी राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या (सुमारे ७०० कि. मी.) आणि मराठवाडा (१६० कि. मी.) व विदर्भातून (४०० कि. मी.) जाणाऱ्या मार्गाबाबत प्रशासकीय यंत्रणेसह सगळीकडेच उदासीनता असल्याने या रस्त्याचे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकले नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी यासाठी जमिनी दिल्या त्यांची फसवणूक झाली आहे.असा आहे मार्ग-नागपूर- बुटीबोरी, वर्धा, पुलगाव, कारंजा (लाड), जालना, औरंगाबाद, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आणि पुढे कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला मिळतो) मुंबई. कोणाला फायदा?या ‘एक्स्प्रेस वे’चा बुटीबोरी, वर्धा, जालना, शेंद्रा, वाळूज, सिन्नर या औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे. याशिवाय सेवाग्राम, लोणार, सिंदखेडराजा, वेरूळ, शिर्डी या धार्मिक आणि पर्यटन केंद्रांनाही याचा फायदा होणार आहे.मात्र, हा रस्ताच अद्याप पूर्ण न झाल्याने या औद्योगिक वसाहती व पर्यटन केंद्रांना याचा फायदा मिळालेला नाही.