शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केंद्रेकरांच्या काळातील परवानगीची तपासणी होणार; विभागीय आयुक्तांचे आदेश

By विकास राऊत | Updated: April 23, 2024 13:39 IST

विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दस्तनोंदणी विभागात झाडाझडती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात बनावट आदेशाने मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रात छेडछाड बनावट अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींमुळे महानगर तथा विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी १५ ऑगस्ट २०१९ पासूनच्या प्राधिकरण कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्यांच्या आदेशानुसार माजी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या काळातील परवानग्या तपासण्यात येणार आहेत.

प्राधिकरण व इतर कार्यालयांतून बोगस अकृषक परवानगी देण्याच्या बाबींना आळा बसावा. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्राप्त प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करावा. कार्यक्षेत्रात एनए-४४ साठी उपलब्ध कागदपत्रे मूळ रेकॉर्डला धरून आहेत का, याबाबतही तपासणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. आयुक्तालयातील बैठकीला महानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर, तहसीलदार रमेश मुंडलोड, पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार कृष्णा कानगुले, खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी, प्राधिकरणाच्या प्रशासन अधिकारी सुनंदा पारवे, सहायक दुय्यम निबंधक राजेश राठोड उपस्थित होते.

आयुक्तांचे निर्देश- प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडांचीच खरेदी-विक्री दस्त नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाने करावी.- नियमितीकरण न झालेल्या गुंठेवारी भूखंडांची कोणत्याही परिस्थितीत खरेदी-विक्री दस्त नोंदणी करू नये.- दस्त नोंदणी करताना शेतजमीन तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.- मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून नियमित आढावा घ्यावा.- मुद्रांक अधिकाऱ्यांनी प्राधिकरण क्षेत्रातील १५ ऑगस्ट २०१९ पासून भूखंडाचे नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून प्रतींसह अहवाल द्यावा. 

एनएबाबत आयुक्तांच्या सूचना- प्राधिकरणाने विकास परवानगी दिलेली नसताना देखील एनए आदेश दिल्याची माहिती द्यावी.- परस्पर बोगस एनए आदेश बनविणाऱ्याविरुद्ध, तसेच बनावट कागदपत्रे सादर करून अकृषक आदेश प्राप्त करणाऱ्याविरुद्ध काय कारवाई केली? एनए परवानगी देताना सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता पडताळावी.- तहसीलदारांनी केवळ झोन दाखल्याच्या आधारे एनए परवानगी देऊ नये. आरडीसींनी नियमित आढावा घ्यावा.

अनधिकृत बांधकामांबाबत सूचना - २४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या आदेशानुसार तहसीलदारांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी.- तहसीलदारांनी सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देऊन कारवाई करावी.- संबंधितांना परवानगीच्या सूचना द्याव्या. मुदतीत परवानगी न घेतल्यास बांधकाम पाडून पोलिसांत तक्रार द्यावी.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबाद