जालना : येथील रेल्वेस्थानकात मालगाड्यांमधून आलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धान्याची नासाडी थांबणार कधी? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेस पडत आहे. प्रत्येक मालगाडीतून शेकडो क्विंटल धान्य तसेच खताची अक्षरश: माती होते. या प्रकारास आम्ही जबाबदार नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. येथील रेल्वेस्थानकाच्या बाजूला मालधक्का आहे. मालगाड्या धान्य, खत, सिमेंट इतर वस्तू घेऊन येतात. विशेषत: या मालधक्क्यावर शेकडो क्विंटल तांदूळ व गव्हाची अतोनात नासाडी होते. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य या मालगाड्यांमधून येते. देशभरातून आलेले धान्य मालधक्क्यावरील तसेच वखार महामंडळाच्या गोदामात साठविल्या जाते. महिन्यातून तीन ते चार मालगाड्यांतून ५० ते ६० डब्ब्यांची गाडी धान्य घेऊन स्थानकांत पोहचते.मालधक्क्यावर नुकसान रोखण्यासाठी कोणतीच उपाय योजना अथवा रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच काळजी घेतले जात नसल्याचे विदारक चित्र नेहमीच पाहावयास मिळते. सदर नुकसानीस रेल्वे प्रशासन अथवा ठेकेदार यापैकी कोण जबाबदार आहे याची नेहमीच चर्चा होते. या चर्चेतच प्रत्येक मालगाडीतून आलेल्या धान्याची माती होते. नुकसान रोखण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांचाही या प्रकाराकडे कानाडोळा आहे. (प्रतिनिधी)रेल्वेची जबाबदारी नाही याविषयी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली असता, रेल्वेचे काम फक्त ट्रान्सपोर्टेशनचे आहे. नुकसानीशी आमचा काहीही संबंध नाही. वखार महामंडळ व सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी आहे. मालाचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधितांनी काळजी घ्यावी, पोत्यांच्या चढ उतारसोबतच इतर बाबींची दक्षता घ्यावी.जालना स्थानकावर महिन्यात दहा ते बारा गाड्याजालना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य, खत, सिमेंट इतर मालासाठी जालना स्थानकांत महिन्याकाठी दहा ते बारा गाड्या येतात. गाड्यातून धान्य अथवा इतर माल काढताना जेमतेम काळजी घेतली जाते. परिणामी, सर्वात जास्त धान्याचे नुकसान होत आहे. वखार महामंडळाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.
धान्याची नासाडी थांबणार तरी कधी ?
By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST