भोकरदन : येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष संघटन वाढवून गावागावातील बूथवरील कार्यकर्त्यांना सक्षम करा. आधी बूथ जिंका, मग पुढची कोणतीही निवडणूक सहजरित्या जिंकता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी येथे केले.शनिवारी भोकरदन येथे झालेल्या भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. यावेळी संघटनमंत्री राजेंद्र फडके, माजी आ़ बबनराव लोणीकर, भाई ज्ञानोबा मुंढे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील दानवे, जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भाऊराव देशमुख यांचीही उपस्थिती होती.सिंह पुढे म्हणाले की, मोदी सरकारचे तीन महिने पूर्ण झाले. या काळात ५ टक्क्यांनी विकास दर वाढला असून ८ टक्क्यांनी महागाई कमी झाली आहे. गावातील प्रत्येक गरीबाला मजबूत करण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरू केली आहे. या योजनेत एका दिवसामध्ये १ कोटी ८० हजार नागरिकांनी खाते उघडली असून त्यांचा १ लाख रुपयांचा विमा सुद्धा निघाला आहे. जुन्या खातेदारांना सुद्धा या योजनेचा लाभ होईल, असे राधामोहन सिंह यांनी सांगितले. यावेळी दानवे म्हणाले की, जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपाची स्थिती मजबूत आहे. सर्व सहकारी संस्था युतीच्या ताब्यात आहेत. यावेळी या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येणार, असा दावा त्यांनी केला.यावेळी नामदेव गाढेकर, शिवाजीराव थोटे, सभापती वर्षा देशमुख, आशा माळी, नंदा भागीले, गणेश फुके, भगवान तोडावत, लक्ष्मण मळेकर, किशोर अग्रवाल, कौतीकराव जगताप, आत्माराम सूरडकर, देवीदास देशमुख, गणेश ठाले, गोविदराव पंडीत, बळीराम कडपे, रामेश्वर सोनवणे, विठ्ठल चिंचपुरे, रामेश्वर भांदरगे, मुकेश चिने, शालिकराम म्हस्के आदी होते.पशुधन विकासासाठी केंद्र सरकारने ९०० कोटी रुपये दिले, मात्र महाराष्ट्र सरकारने ५०० कोटी रुपये सुद्धा खर्च केले नाही. किंवा त्याचा हिशोबही दिला नाही, असे सांगून राज्य सरकार विकलांग असल्याचा आरोप सिंह यांनी केला
बूथ कार्यकर्त्यांना सक्षम करा-राधामोहन सिंह
By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST