शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पालिकेत अजूनही निवडणूक ज्वर

By admin | Updated: May 13, 2014 00:57 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली असली तरी मनपातील अनेक अधिकारी अजून आचारसंहितेच्या अमलाखालीच वावरत आहेत.

 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली असली तरी मनपातील अनेक अधिकारी अजून आचारसंहितेच्या अमलाखालीच वावरत आहेत. पालिकेत दुपारी ३ ते ५ नागरिकांना भेटण्याच्या वेळेत अधिकारी दांडी मारीत असल्याची ओरड नगरसेवक आणि नागरिकांनी सुरू केली आहे. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असतानाही बहुतांश अधिकारी आज पालिकेत फिरकले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विभागप्रमुख पालिकेत नसल्याचे पाहून कनिष्ठ अधिकारीही दुपारनंतर विभागात फिरकत नाहीत. महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक पथदिवे बंद पडले आहेत. ड्रेनेज तुंबले आहेत. या कामांकडे प्रशासन लक्ष देत नाही. आचारसंहिता राजकीय पुढार्‍यांसाठी असून त्याची अंमलबजावणी कशी केले जाते, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही अधिकार्‍यांची निवड केली जाते. निवडणुकीची ड्यूटी करणे अधिकार्‍यांना बंधनकारक असते; परंतु निवडणूक आचारसंहितेच्या काळात मुख्य ड्यूटी करणेही महत्त्वाचे असते. मनपातील अधिकारी मात्र याला अपवाद ठरत आहेत. अनेक अधिकारी मुख्यालयातून दुपारी १ वाजताच गायब होतात. सायंकाळी ५ वाजता ते कार्यालयात परत येतात. नागरिकांच्या समस्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे या समस्यांकडे दुर्लक्ष करावे, असे आचारसंहितेत कुठेही म्हटलेले नाही. मात्र, पालिकेत नागरिकांच्या या समस्यांकडे कुणी लक्ष देणार की नाही. त्यासाठी प्रशासनाचे नियोजन काय असावे, हे आयुक्त डॉ. कांबळे यांनी ठरविणे गरजेचे आहे. मात्र, सर्व जण स्वत:चे उद्योग सांभाळून पालिकेत नोकरी करीत असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुक्त पुन्हा मुंबईला आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आज सायंकाळी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. एका तातडीच्या बैठकीसाठी ते मुंबईला गेल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून समजले आहे. ११ मार्चपासून आयुक्तांनी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांच्या हजेरीची नोंद घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांची नोंद घेण्याचा उपक्रम महिनाभर राबविला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. परिपत्रक काढू आयुक्तांच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना दुपारी ३ ते ५ या वेळेत पालिकेत थांबण्यासाठी परिपत्रक काढून सूचित करण्यात येईल, असे आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी सांगितले. काय म्हणतात नगरसेवक नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले की, आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी त्यांच्या वेळेत मनपात थांबणे गरजेचे आहे. नगरसेवक बालाजी मुंडे म्हणाले की, हा प्रकार थांबला नाही, तर उद्या १३ रोजी अधिकार्‍यांच्या दालनाला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात येईल. नगरसेवक बबन नरवडे म्हणाले की, माझ्या वॉर्डातील अनेक कामे ठप्प आहेत. अधिकारी नसल्यामुळे कामे होत नाहीत.