पांडुरंग खराबे , मंठानिम्न दुधना प्रकल्पातून लिफ्ट ऐरिगेशनद्वारे शेतीला २४ तास पाणी सोडण्यात येत असल्याने परिसरातील सहा गावातील कोरडवाहु जमीन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.परतूर, मंठा आणि परभणी जिल्ह्यातील सेलू या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी निम्न दुधना प्रकल्प हा वरदान ठरत आहे. या तीनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. मंठा तालुक्यात काही ठिकाणी हलक्या जमिनी आहे. त्यांनाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होत आहे. शासनाने आता लिफ्ट ऐरिगेशन (उपसा सिंचन) योजना कार्यान्वीत करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नानसी, मंगरूळ, विडोळी, केदारवाडी, वांजोळा या गावातील शेकडो एकर कोरडवाहु जमीन आता ओलिताखाली आली आहे.उपसासिंचन योजनेमुळे निम्न दुधना प्रकल्पातून या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास पाणी सोडण्यात येत आहे. शेतीचा पाणी प्रश्न सुटल्याने या परिसरातील शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे. कापूस, ऊस, तूर व अन्य पिकांना पाणी मिळत असल्याने चांगले उत्पन्न होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.शेतीसाठी उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध झाल्यामुळे कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता जमिनीची मशागत मोठ्या प्रमाणात करत आहेत. काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवरही भर दिला आहे. ४बागेश्वरी साखर कारखाना सुरू होणार असल्याने कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी बेनेही देण्यात येत असल्याने यावर्षी ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असल्याचे दिसून येत आहे.
सहा गावांतील कोरडवाहू जमीन आली ओलिताखाली
By admin | Updated: October 27, 2014 00:09 IST