व्यंकटेश वैष्णव, बीडबीडचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना विकासाचे व्हिजन तयार केले होते़ जिल्ह्याच्या विकासासंदर्भात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव टी. विजयकुमार यांची बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी बैठक निश्चित केली होती. ही बैठक सात जूनला होणार होती. मात्र मुंडे यांच्या अकाली निधनामुळे सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.२६ मे रोजी गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे ग्रमाविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. पदभार स्विकारल्या नंतर मुंडे हे सतत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी दुरध्वनी वरून संवाद साधायचे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या संदर्भात कोणत्या योजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. आज स्थितीत पाणी पुरवठा संदर्भात काय करायचे याबाबत चर्चा होत होती. जिल्हाधिकारी राम यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना आठ दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यात प्राधान्याने राबवाव्या लागणार्या योजनांचा आराखडा दिला होता. मात्र ३ जून रोजी सकाळी मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.निधनाच्या एक - दोन दिवसापुर्वीच मुंडे यांनी जिल्हाधिकारी राम यांच्याशी दुरध्वनीवरून अर्धातास चर्चा केली. यावेळी बीड जिल्ह्यातून होत असलेले मजूरांचे स्थलांतर यासाठी तात्काळ कुठली योजना राबविता येऊ शकते., त्याच बरोबर नरेगा च्या माध्यमातून गावांमध्ये शौचालये उभारणी, पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासंबधी चर्चा झाली. या योजना तात्काळ राबविण्याचे देखील मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना बोलून दाखवल्या. मुंडे साहेबांनी सांगितलेल्या योजनांवर जिल्हाधिकारी यांनी काम करण्यास सुरूवात देखील केली होती. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मुंडे यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्यग्रामविकास पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या विविध योजनांवर माझ्याशी चर्चा केलेली आहे. मुंडे यांच्या निधनाच्या एक दिवस अगोदर पर्यंत ते माझ्याशी दुरध्वनीवर बोलले आहेत. त्यांनी बोलून दाखविलेल्या सर्व योजनांना मी प्राधान्य देणार आहे, असे राम यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न राहिले अधुरेच !
By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST