शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पितळ उघडे पडू नये म्हणून केला खटाटोप...!

By admin | Updated: February 4, 2016 00:35 IST

जालना : अन्न व औषधी प्रशासनाने मंगळवारी विविध छाप्यांत जप्त केलेल्या गुटखा नष्ट केल्याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने मांडली.

जालना : अन्न व औषधी प्रशासनाने मंगळवारी विविध छाप्यांत जप्त केलेल्या गुटखा नष्ट केल्याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने मांडली. याद्वारे एफडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तर बुधवारी कारभार न सुधारता त्यात अधिकच भर पडली असून सुगंधी तंबाखुचे केवळ रिकामे डब्बेच आढळून आले. त्यामुळे डब्यातील तंबाखू गेली कोठे, हाही प्रश्न अनुत्तरीतच राहतो.अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात ३६ पैकी ३२ कारवायांतील ५ टन गुटखा नष्ट केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात १४ जुलै २०१४ ते २६ आॅगस्ट २०१५ या कालावधीत अन्न व औषधी प्रशासन विभागाने २८ ठिकाणी कारवाया करून त्यातील १० लाखांचा साठा तसेच २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांत बदनापूर पोलिसांनी पकडून दिलेला १ कोटी ८० लाखाचा साठा असा साठा गोदामात ठेवल्याची कबुली स्वत: अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ. गो. देशपांडे यांनी लोकमतला दिली होती. याबाबत पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पकडलेल्या मालाची किंमत जरी एक कोटी असली तरी बाजारातील किंमत चार ते पाच कोटी असल्याचे सांगितले होते. त्याबाबतचे वृत्त २९ आॅगस्ट रोजी प्रकाशित झाले होते. २९ आॅगस्ट २०१५ पर्यंत जरी सुमारे दोन कोटींचा माल गोदामात पडून होता. तर त्यापुढे किती कारवाया केल्या ? त्या कारवायातील माल जप्त केला ? तो माल गेला कोठे ? गटखा बंदीबाबत अधिकतर कारवाया या पोलिसांनीच केलेल्या आहेत. पोलिस अंदाजित साठ्यांची किंमत काढते. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या किंमतीत तफावत असल्याचे सहाय्यक आयुक्त देशपांडे सांगतात. मंगळवारी जाळण्यासाठी दोन ट्रकमध्ये गुटखा आणण्यात आला. ते ही अर्धेच भरलेले होते. त्यातील एकाच ट्रकचे मोजमाप करण्यात आले. दुसऱ्याचे मोजमाप न करताच तो अर्धामाल नष्ट करण्यासाठी कंपनीच्या भट्टीत टाकण्यासाठी उतरविला. बदनापूर पोलिसांनी जामवाडी येथील गोदामातून दोन भरगच्च भरलेले ट्रक गुटखा जप्त केला होता. तसेच सुंगधी तंबाखूही मोठ्या प्रमाणात जप्त केली होती. मंगळवारी नष्ट करण्यासाठी आणण्यात आली. मात्र सुंगंधी डब्यातील तंबाखूच गायब असल्याचे निदर्शनास आले. अनेक डब्बे रिकामाचे दिसून आल्याने डब्यातील तंबाखू गेली कुठे हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. गुटखा जाळण्यासाठी एफडीएने जिल्हाधिकाऱ्यांना पाचरण करून आमचा कारभार किमी पारदर्शक आहे. हेच दाखविण्याचा प्रयत्न एफडीए ने केला. प्रत्यक्षात जप्त माल आणि जाळलेल्या मालाचे गौडबंगाल समोर येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांच्या समक्ष काही माल त्या छोट्याशा भट्टीत जाळण्यात आला. स्वत: जिल्हाधिकारी आल्याने आपले कोणी काही करू शकत नाही. असा आव आणून निम्माच माल जाळण्यासाठी आणला. मग निम्मा माल गेला कुठे ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.