शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अहवालासाठी वेळ मिळेना !

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

लातूर : कुटुंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा बळी जाऊन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी अद्यापही शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही़

लातूर : कुटुंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा बळी जाऊन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी अद्यापही शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही़ लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून हा अहवाल आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागास वेळच मिळत नसल्याने या घटनेस जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही होऊ शकली नाही़उदगीर येथे सालगडी म्हणून काम करीत असलेले मालू टाळीकुटे यांची पत्नी ललिताबाई टाळीकुटे यांच्यावर कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला होता़ या शस्त्रक्रियेसाठीचे साहित्य तिच्या पोटात गेले नाही़ दरम्यान, काही तासानंतर तिचे पोट फुगुन अंगात ताप भरला़ त्यामुळे उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले़लातुरात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली़ परंतु, त्यानंतर ती दगावली़ हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पाहून लोकमतमधून सविस्तर वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले़ त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समितीची स्थापना केली़ या समितीने उदगीरमध्ये सदरील महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करुन तिचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केला़ परंतु, हा लिखित अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांच्याकडे पोहोचण्यासाठी दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला़ या अहवालात महिलेचा मृत्यू जंतूसंसर्गामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अद्यापही दुजोरा मिळू शकला नाही़ही घटना घडून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असली तरी अद्यापही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सदरील महिलेच्या शवविच्छादनाचा अहवाल प्राप्त झाला नाही़ विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अहवाल लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणण्यास वेळच मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ वैद्यकीय अहवाल उपलब्ध नसल्याने या घटनेस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होऊ शकली नाही़ वास्तविक पाहता जिल्हा आरोग्य विभागाकडूनच हे प्रकरण दाबण्यासाठी चालढकल करण्यात येत आहे की काय? असा सवाल होत आहे़ (प्रतिनिधी)पुन्हा तेच बोल...वास्तविक पाहता गत आठवड्यातच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे चौकशी करुन हा अहवाल मिळविणार असल्याचे सांगितले होते़परंतु, आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अहवाल आणण्यासाठी कर्मचाऱ्यास कुठलीही सूचना केली नाही़ त्यामुळे डॉक्टरास अभय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की काय? असा सवाल होत आहे़ आम्ही पोलिसांकडे चौकशी केली़ परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे आता आम्ही लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडे चौकशी करुन तो प्राप्त करुन घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी सांगितले़