जालना : इंदिरा इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षासाठी घरकुलांसाठी निवड झालेल्या ४,३४४ लाभार्थ्यांना थेट मंजुरीचे आदेश पाठविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही योजना राबविली जाते. अनुसूचीत जातीच्या सुधारित प्रतीक्षा यादीतील ३०८३ तर सर्वसाधारण प्रवर्गातील १२६१ लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षासाठी घरकुलांचे उद्दिष्ट्य ४३९९ एवढे ठेवण्यात आले. परंतु त्यापैकी वरील लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.गेल्यावर्षीपासून इंदिरा आवास योजनेतंर्गत घरकुलाची किंमत एक लक्ष करण्यात आली असून यामध्ये केंद्र शासनाकडून ५२ हजार ५०० रूपये व राज्य शासनाकडून ४२ हजार ५०० अशी अनुदानाची रक्कम आहे. त्यात अनुदानापोटी ९५ हजार व लाभार्थी हिस्सा ५ हजार रूपये इतका आहे. मंजूर लाभार्थ्यांसाठी रहिवाशी प्रमाण, नमुना क्र.८, दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबपत्रक करारनामा, यापूर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्या बाबतचा दाखला, इत्यादी कागदपत्रासहीत प्रस्ताव मागविण्यात आले होते. (प्रतिनिधी)जालना ७४८, बदनापूर ४३२, अंबड ५०६, घनसावंगी ५५०, परतूर ४२७, मंठा ३९८, भोकरदन ८५७, जाफराबाद ४२६ असे एकूण ४३४४ लाभार्थी आहेत.४जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा पंचायत समितीमध्ये घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहून दलाल मंडळी संबंधित लाभार्थ्यास गाठून मी घरकुल मंजूर करून आणले, असा आव आणत संबंधितांकडून पैसे उकळण्याचे प्रकार करीत होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही काही सदस्यांनी विषय मांडला होता. ४या पार्श्वभूमीवर घरकुल लाभार्थ्यांना थेट मंजुरीचे आदेश देण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हा परिषद सीईओंनी घेतला. त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट मंजुरीचे आदेश देण्यात येत आहेत.
घरकुलाच्या लाभार्थ्यांना थेट आदेश
By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST