कंटाळा, आळस, लोकांशी न पटणे हेही आजार असून शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहाराशी आहे. त्यामुळे संतुलित आहार घेणे, स्वच्छता, व्यायाम, खेळ, ध्यानधारणा या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे डॉ.अस्मी भट्ट यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थी विकास व किशोरी विकास प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांना व्यवहार व संभाषण कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी भाजी मंंडईचे आयेाजन करण्यात आले होते. बाजारात वस्तू विकणे आणि विकत घेणे, ही एक कला असल्याचे विद्यार्थ्यांना या उपक्रमातून समजले. सकस आहार स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भरतकुमार रिडलोन यांनी संचालन केले. सुजाता कर्पकांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्योती गवळी यांनी आभार मानले. डॉ.दिवाकर कुलकर्णी, सविता कुलकर्णी, वंदना सुरडकर, योगेश जोशी, कविता शिरवत, यांच्यासह सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.