शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चुरशीच्या लढतीत धोंडेंची बाजी

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

राजेश खराडे ,बीड जिल्ह्यात मोदी लाट व स्व. गोपीनाथ मुंडे यांची भावनिक लाट ही बीड मतदार संघावर व आष्टी, पाटोदा, शिरुर या मतदार संघावर काही परिणाम होणार नसल्याचे बोलले जात होते.

राजेश खराडे ,बीडजिल्ह्यात मोदी लाट व स्व. गोपीनाथ मुंडे यांची भावनिक लाट ही बीड मतदार संघावर व आष्टी, पाटोदा, शिरुर या मतदार संघावर काही परिणाम होणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या दोन मतदार संंघावर आजी-माजी राष्ट्रवादी उमेदवारांची पकड असल्याने विजय निश्चित मानला जात होता. मात्र बीड मतदार संघात क्षीरसागर यांचा काठावर विजय तर आष्टी मतदार संघात धसांना काठावर पराजय स्वीकारावा लागला आहे. मतमोजणी प्रक्रियेदिवशी सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते ते बीड व आष्टी मतदार संघातील निकालाकडे. बीडमधून रा.कॉ.जयदत्त क्षीरसागर व भाजपाचे विनायक मेटे या दोन प्रमुख उमेदरांतच खरी लढत झाली होती तर आष्टी मतदार संघात रा.कॉ. सुरेश धस व भाजपाचे भिमराव धोंडे यांच्या सरळ लढत झाली होती. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत रा.कॉ. ला सुरुंग लागला होता यातून बीड आणि आष्टी मतदार संघ निभावेल असे वाटत होते मात्र मोदींची लाट व जनतेचा रोष यातून आष्टी मतदार संघही रा.कॉ. च्या हातचा गेला आहे.तरीही सुरेश धस पराभूतचआष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघातील १३ जि. प. गटांपैकी ७ गटातून रा.कॉ. चे सुरेश धस यांना मताधिक्य असले तरी इतर ६ गटातून भीमराव धोंडे यांना मताधिक्य असले तरी मताधिक्यात तफवात अधिक असल्याने धोंडे यांचा काठावर का होईना विजय झाला आहे.दादेगांव गटातून ११७९, धामनगांव गटातून ३२३८, लोणी गटातून ४५०, मानूर गटातून ४३६२ मतांचे मताधिक्य, पाचंग्री गटातून ३९८६ तर तिंतरवणी जि.प.च्या गटातून सर्वाधिक ४४९७ मतांचे मताधिक्य भाजपाचे भिमराव धोंडे यांच्या पदरी पडले आहे. रा.कॉ. चे सुरेश धस यांना दौलावडगाव गटातून ७१६, आष्टीतून ४९५, हरिनारायण आष्टा या गटातून सर्वाधिक ५८२८ ऐवढे मताधिक्य धस यांना मिळाले आहे. कडा गटातून केवळ ७६६, पाटोदा गटातून १४८२, आमळनेर गटातून १९२२ मताधिक्य मिळाले आहे. तर शिरूर जि.प.च्या गटातून केवळ ४४३ मताधिक्य हे सुरेश धस यांना पडले आहे. मताधिक्याची तफावत ही धोंडेच्या विजयासाठी महत्वाची राहिली आहे. १भीमराव धोंडेभाजप१२०१५८२राजेंद्र जरांगेअपक्ष७६९३सुरेश धसराकाँ११३९५१४वसंत धोंडेबीएसपी१२५०५मीनाक्षी पांडुळेकाँग्रेस३३५४६तुकाराम काळेभारिप७७७७विष्णुपंत घोलपअपक्ष४७०८शिवाजी थोरवेअपक्ष५१०९महादेव नागरगोजेसीपीआय१३०३१०अशोक दहिफळेशिवसेना२७९४११वैभव काकडेमनसे१४३९१२मधुकर मोरेअपक्ष८५२मतदार संघातील आष्टी, पाटोदा, आमळनेर आदी जि.प.चे गट वगळता सुरेश धस हे मायनस मध्ये राहिले आहेत. आष्टी जि.प. गटातून सुरेश धस यांच्या पदरी १० हजार २०५ ऐवढी मते तर दुसरे प्रमुख उमेदवार भिमराव धोंडे यांना ९ हजार ७१० ऐवढी मत मिळाली आहेत. हरिनायण आष्टा गटातून सुरेश धस यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले असून त्यांच्या जामगांवातून त्यांना १७०० मताचे सर्वात जास्त मताधिक्य मिळाले आहे तर भिमराव धोंडे यांना या गावातून केवळ २० मते मिळाली आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील प्रमुख गावात रा.कॉ. चे सुरेश धस यांना मताधिक्य मिळले आहे मात्र ग्रामीण भागात माजी. आ. सुरेश धस हे मायनस मध्ये राहिले आहेत. शिरुर कासार येथून आ. भीमराव धोंडे यांना १२२७ मध्ये तर राकाँचे सुरेश धस यांना १३४०, पाटोद्यातून धोंडे यांना २५६७ तर धस यांना २८९८, आष्टीतून धोंडे यांना २८२० तर सुरेश धस यांना ३ हजार ११४३ या प्रमाणे मताधिक्य मिळाले. मतदारसंघातील या प्रमुख शहरातून सुरेश धस यांना मताधिक्य मिळाले असले तरी ग्रामीण भागातून मात्र भाजपाचे भीमराव धोंडे यांची सरशी झाली.