पैठण/गंगापूर : पैठण व गंगापूर येथे गुरुवारी झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही त्यांना नगराध्यक्षपद मिळू शकले नाही. यामुळे दोन्ही ठिकाणी काँग्रेसला जबर धक्का बसला. दरम्यान, कन्नड व वैजापूर येथील नगराध्यक्षांची गेल्या आठवड्यातच बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही ठिकाणी मात्र काँग्रेसने बाजी मारली. वैजापुरात शिल्पा परदेशी व कन्नडमध्ये संतोष कोल्हे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.पैठण येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार संदीपान भुमरे, पं.स. सभापती विलास भुमरे, संतोष सव्वासे, आबा बरकसे, अंबादास नरवडे यांच्यासह शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.गंगापूर पालिका प्रशांत बंब गटाकडेगंगापूर : गंगापूरच्या नगराध्यक्षपदी आ. प्रशांत बंब यांच्या गटाच्या नीलम संदीप खाजेकर यांचा चमत्कारिक विजय झाला, तर काँगे्रसचे बंडखोर फैसल चाऊस यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. बहुमत असतानाही काँग्रेसला येथे मोठा धक्का बसला. गुरुवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. काँग्रेस पक्षातर्फे मंदाबाई अशोक खाजेकर यांनी, तर आ. प्रशांत बंब आघाडीतर्फे नीलम खाजेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पीठासीन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पाडावी असे म्हणून प्रत्यक्ष मतदान घेतले. यात उमेदवार नीलम संदीप खाजेकर यांच्या बाजूने १६ नगरसेवकांपैकी ९ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यात नीलम संदीप खाजेकर, प्रदीप पाटील (बंब गट) काँग्रेस गटाचे फैसल चाऊस, नजमा नवाब शेख, शकीला युनूस कुरेशी, सुवर्णा सुधाकर पाटील, शिवसेनेच्या दीपाली सचिन भवार, रंजना प्रकाश जैस्वाल, विजय पानकडे यांचा समावेश आहे, तर काँग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या मंदाबाई अशोक खाजेकर यांना ७ मते पडली. त्यांना मावळते नगराध्यक्ष संजय जाधव, संजय जैस्वाल, संदीप दारुंटे, सुवर्णाताई जाधव, बिजलाताई ज्ञानेश्वर साबणे, आशाबी नईम मन्सुरी, मंदाताई खाजेकर यांनी मतदान केले. या सर्व निवड प्रक्रियेत शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत गैरहजर राहिले.लक्ष्मणसिंग राजपूत गैरहजरउपनगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यात मावळते उपनगराध्यक्ष फैसल चाऊस व शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत यांचा समावेश होता. मात्र, या प्रक्रियेत मतदान घेताना लक्ष्मणसिंग राजपूत अनुपस्थित राहिल्याने फैसल चाऊस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नीलम खाजेकर व फैसल चाऊस यांची निवड जाहीर होताच रिजवान पठाण, सुनील धाडगे, तस्लीम टेलर, रामेश्वर पाटील, राहुल खाजेकर, प्रकाश खाजेकर, अश्पाक कुरेशी, मच्छिंद्र लगड, दीपक साळवे, नयन शेंगुळे, लक्ष्मण आळंजकर, बाबूभाई शेख, महेश कासार, सिद्धार्थ खाजेकर, राहुल पानकडे, रज्जाक कुरेशी, शेख लाला, रियाज जहागीरदार आदी समर्थकांनी जल्लोष केला. (वार्ताहर)चमत्कारिक विजयगेल्या महिनाभरापासून न.प. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी गंगापूर शहरात चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. काँग्रेसचे मावळते नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या गटात ११ नगरसेवक असल्याने नगराध्यक्षपद काँग्रेस पक्षालाच मिळेल अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षातील फैसल चाऊस, नजमा शेख, शकिला कुरेशी व सुवर्णा पाटील यांनी बंब गटाला आपला पाठिंबा दर्शविला. यामुळे काँग्रेस पक्ष अल्प मतात आला, तर शिवसेनेच्या दीपाली भवार, रंजना जैस्वाल व विजय पानकडे यांनीही बंब गटालाच पसंती दिली. काँग्रेसचे चार, शिवसेनेचे तीन व बंब गटाचे २ असे मिळून ९ मते आ. बंब गटाकडे आल्याने त्यांचे पारडे जड झाले व दोनच नगरसेवक असताना आ. बंब यांनी सर्वांनाच पुन्हा एकदा झटका देत नीलम खाजेकर यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले.वैजापूरचे उपनगराध्यक्षपदपुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेवैजापूर : वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शिल्पा दिनेश परदेशी यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप रामदास टेके यांची गुरुवारी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.नगरपालिकेच्या फुले आंबेडकर सभागृहात विशेष सभेचे आयोेजन करण्यात आले होते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून नारायण उबाळे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी बी.यू. बिघोत यांनी सहकार्य केले. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान तांबे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, राजूसिंह राजपूत, नगरसेवक वसंत त्रिभुवन, मजीद कुरेशी, राजेंद्र साळुंके, रमेश हाडोळे, दशरथ बनकर, नगरसेविका लता व्यवहारे, अफरोज बेगम, सुरेखा धुमाळ, संगीता गायकवाड, नंदा त्रिभुवन, ज्ञानेश्वर जगताप, गोविंद धुमाळ, सुरेश धुमाळ, युवराज चेळेकर, प्रकाश माळी, सलीम तांबोळी, प्रवीण तांबे, अब्दुल मलिक काझी, जयपाल राजपूत, बाळासाहेब चव्हाण, शेख सलीम, संतोष वैराळ, ज्ञानेश्वर चव्हाण आदींची उपस्थिती होती.दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवरअनुक्रमे शिल्पा परदेशी व संदीप टेके यांची फेरनिवड होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाल्याने आज केवळ औपचारिकता शिल्लक होती. यानंतर शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)पैठणमध्ये शिवसेना-भाजपातर्फे जल्लोषपैठण : पैठणच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता गोर्डे, तर उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या रेखा कुलकर्णी यांची निवड झाली. नगर परिषदेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील दुही उघड झाली आहे. न.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी दुपारी ३ वाजता न.प.च्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता गोर्डे, राखी परदेशी असे दोन व काँग्रेसचे जितसिंग करकोटक असे तीन उमेदवार रिंगणात होते. २० चे संख्याबळ असलेल्या न.प.च्या सभागृहात मतदानासाठी २० पैकी फक्त १५ नगरसेवक हजर होते. दरम्यान, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दत्ता गोर्डे यांच्या नावाने मतदानासाठी व्हीप जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी व माजी आमदार संदीपान भुमरे यांनी नगरसेवकांना बजावला.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांना ९ तर काँग्रेसचे जितसिंग करकोटक यांना ४ मते मिळाली. यावेळी काँग्रेसच्या शिल्पा पल्लोड व कमल लोहिया या दोन महिला नगरसेवक तटस्थ राहिल्या. दत्ता गोर्डे यांना राखी परदेशी, मंगल मगर, ललिता पोरवाल, स्वत: गोर्डे, भाजपाच्या रेखा कुलकर्णी, सुवर्णा रासने, शहरविकास आघाडीच्या अर्चना गव्हाणे, काँग्रेसचे राजू गायकवाड, राष्ट्रवादीचे अप्पासाहेब गायकवाड असे ९ मतदान झाले, तर काँग्रेसचे जितसिंग करकोटक यांना स्वत: जितसिंग करकोटक, शेहनाझ टेकडी, तस्लीम शेख, सोमनाथ भारतवाले असे चार मतदान झाले. यात शिवसेनेचे दत्ता गोर्डे विजयी झाले. रेखा कुलकर्णी यांना ८ मतेउपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या रेखा कुलकर्णी यांना ८ तर काँग्रेसच्या शेहनाझ टेकडी यांना ५ मते मिळाली. यात भाजपाच्या रेखा कुलकर्णी विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राजू गायकवाड यांनी पक्षाच्या उमेदवार शेहनाझ टेकडी यांना मतदान केले. (वार्ताहर)अहवाल येताच कारवाई करणार -केशवराव औताडेपैठण व गंगापुरातील काँग्रेसचा पराभव मान्य करून जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले की, अहवाल येताच संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल.काँग्रेसच्या ‘व्हीप’चे ११ पैकी ४ नगरसेवकांकडूनच पालनपैठण न.प. मध्ये काँग्रेसचे २० पैकी ११ नगरसेवक म्हणजे स्पष्ट बहुमत आहे, असे असतानाही काँग्रेसला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे असा व्हीप बजावण्यात आला होता. या व्हीपचे ११ पैकी ४ नगरसेवकांनी पालन केले. काँग्रेसच्या ११ नगरसेवकांपैकी यावेळी पाच नगरसेवक मुस्लिम समाजाचे असल्याने व न.प.च्या इतिहासात नगराध्यक्षपद मुस्लिम समाजाला न मिळाल्याने यंदा उमेदवारी मुस्लिम समाजाच्या नगरसेवकास द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आझीम कट्यारे यांनी केली होती. या मुद्यावरून काँग्रेसच्या नगरसेवकात मतभेद निर्माण झाले होते. उमेदवारी न मिळाल्याने या नगरसेवकांनी नाराजी मतपेटीतून आज उघड केल्याचे स्पष्ट झाले.सभागृहात हजर असलेले नगरसेवक मतदानासाठी २० पैकी १५ नगरसेवक उपस्थित होते. यात शिवसेनेचे दत्ता गोर्डे, मंगल मगर, राखी परदेशी, ललिता पोरवाल, भाजपाच्या, सुवर्णा रासने, रेखा कुलकर्णी, काँग्रेसचे जितसिंग करकोटक, सोमनाथ भारतवाले, शेख तस्लिमा, शेहनाझ टेकडी, शिल्पा पल्लोड, कमल लोहिया, राजू गायकवाड, राष्ट्रवादीचे अप्पासाहेब गायकवाड, शहरविकास आघाडीच्या सुवर्णा रासने हे १५ नगरसेवक हजर होते. मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या शिल्पा पल्लोड व कमल लोहिया या दोन महिला नगरसेवक तटस्थ राहिल्या. गैरहजर नगरसेवक काँग्रेसचे सुधाकर तुपे, इनाम अन्सारी, आझीम कट्यारे, शेख अब्बास शेख कासम ऊर्फ राजूभाई वीटभट्टीवाले यांच्यासह शहर विकास आघाडीचे सुभाष पटेल हे गैरहजर होते. नागरी सुविधांना प्राधान्य देणार - दत्ता गोर्डेनवनिर्वाचित नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी शहराची स्वच्छता, रस्ते, लाईट व पाणी या नागरी सुविधा देण्यास प्राधान्य देत शहराचा रचनात्मक विकासासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया दिली.
बहुमत असतानाही काँग्रेसला जबर धक्का
By admin | Updated: July 18, 2014 01:53 IST