खुलताबाद : तालुक्यातील इंदापूर शिवारात हरणांचा कळप मोठ्या प्रमाणावर कोवळी पिके फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. वनविभागाने या हरिणांचा बंदोबस्त करण्याची मागणी इंदापूरचे माजी उपसरपंच संदीप निकम पाटील निवेदनाद्वारे केली आहे.
इंदापूर शिवारात हरणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कपाशी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन अशा अनेक पिकांचे हरणांचे कळप नुकसान करीत आहे. तीस ते चाळीस हरणांचा मोठा कळप नुकतेच उमजलेली पिके फस्त करीत आहेत. रात्री शेतात थांबल्यामुळे बिबट्या, रानडुक्कर व अन्य हिंस्त्र प्राण्यांपासूनसुद्धा शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील कोवळी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतवस्तीवर जागरणासाठी जावे लागत आहे. वनविभागाच्या वतीने हरिणांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
----
फोटो : इंदापूर शिवारात हरणांकडून कोवळी पिके फस्त केली जात आहेत.
270621\sunil gangadhar ghodke_img-20210626-wa0053_1.jpg
इंदापूर शिवारात हरिण अशाप्रकारे कोवळ्या पिकांना फस्त करीत असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.