लातूर : राज्यातील आघाडी सरकारने केवळ घोषणाच केल्या, कृती मात्र काहीच केली नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले़लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते़ यावेळी प्रदेश सरचिटणीस संभाजीराव पाटील निलंगेकर, उपाध्यक्ष गोविंद केंदे्र, प्रवक्ते गणेश हाके, मेळावा संयोजक रमेश कराड, डॉ़ गोपाळराव पाटील, टी़पीक़ांबळे, दिलीपराव देशमुख, अॅड़ बळवंतराव जाधव, ओम गोडभरले, नवनाथ भोसले, शैैलेष लाहोटी, मोहन माने, डॉ़ गितांजली पाटील, शालिनी कराड, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, हनुमंतबापू नागटिळक, श्रीकृष्ण जाधव यांची उपस्थिती होती़३० वर्षानंतर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत मिळाल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे पानीपत झाले़ राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे़ सध्या मराठवाडा कोरडा असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जागा वाटपात मशगूल आहेत़ शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली़ महायुतीची सत्ता आल्यास महराष्ट्र भारनियमनमुक्त करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ राज्यात महायुतीचे सरकार नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची अंमलबजावणी होणार नाही़ विद्यमान मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घेत नाहीत़ रेणापूर भागाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व़ गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट मतदारांनी जप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी माजी उपसभापती विक्रम शिंदे, अमोल पाटील, हणमंत कापरे, रघुनाथ पाटील, विष्णु पोहरेगावकर, किशन लोमटे, दिंगबर गिरी, गनिमीकावा संघटनेचे बालाजी सूर्यवंशी, रवि सूर्यवंशी, देवा चिंचोलकर, महिला काँगे्रसच्या उपाध्यक्ष ज्योती भोकरे, सेनेचे सचिन मोटेगावकर, मारूती गणेशकर, रमाकांत संपत्ते, लोकसंग्रामचे बाळासाहेब होळकर, संतराम जटाळ, माजी सभापती अनिल शिंदे, भागवत संपत्ते, प्रवीण येळ्ळे, भारीपचे भगवान कोकाटे, बाळासाहेब शिंदे, बाजार समितीचे माजी संचालक नागेश वाघमारे, विलास पाटील, वसंतराव काळे, शिवाजीराव मोरे, अशोक खुने, गणेश बोंबडे, कार्तिक स्वामी, रावसाहेब बरडे आदींनी भाजपात प्रवेश केला़ (प्रतिनिधी)
आघाडी सरकारकडून घोषणाच !
By admin | Updated: August 10, 2014 02:21 IST