शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

दौलताबादला पोलीस ठाणे सुरु

By admin | Updated: September 8, 2014 00:36 IST

दौलताबाद : औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील मिळून २३ गावे आणि ५५ हजार लोकसंख्येसाठी दौलताबाद येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले

दौलताबाद : औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील मिळून २३ गावे आणि ५५ हजार लोकसंख्येसाठी दौलताबाद येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले असून, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांच्या हस्ते रविवारी ठाण्याचे उद्घाटन करून ठाण्याच्या कारभाराला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त अरविंद चावरिया, वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त रामराव हाके आदींची उपस्थिती होती. ऐतिहासिक दौलताबाद किल्ला, परिसराची वाढती लोकसंख्या, महामार्गावर होणारे अपघात, पर्यटन स्थळांचे वाढते महत्त्व या सर्व बाबींचा विचार करून गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. यासाठी माजी जि. प. सदस्य विनोद पाटील यांनी मागणी केली होती. उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आयुक्त म्हणाले, छावणी पोलीस ठाण्याची हद्द खूप मोठी झाली होती. त्यामुळे आम्ही दौलताबादला पोलीस ठाणे मागितले होते. याशिवाय हर्सूल येथेही पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. यापैकी आम्ही दौलताबादला प्राधान्य दिले. या ठाण्यातील पोलिसांनी लोकांचा विश्वास जिंकण्याचे काम करावे. पोलीस निरीक्षकांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक सर्वांना द्यावा. यावेळी सरपंच संजय कांजुणे, उपसरपंच सय्यद हारुण, अब्दीमंडीचे मा. सरपंच दौलतसिंग हजारी, शेख वहीद, दादासाहेब म्हस्के, गोरक्षनाथ राऊत, सय्यद सलीम, के.के. जाधव, बी.के. पठाण यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक धनंजय येरुळकर यांनी तर सूत्रसंचालन डी.के. पैठणे यांनी केले. आभार सहायक पोलीस आयुक्त रामराव हाके यांनी मानले. (वार्ताहर)या गावांचा समावेशऔरंगाबाद तालुका : दौलताबाद, माळीवाडा, अब्दीमंडी, केसापुरी, शरणापूर, धरमपूर, करोडी, शिरसमाळ, जटवाडा, वंजारवाडी, रामपुरीगंगापूर तालुका : जांभळा, पोटूळ, कदीम टाकळी, टाकळीवाडी, आसेगाव, शहापूर बंजर, सिंधी खिरसगाव, फतुलाबाद, रसूलपुराअसा असेल स्टाफधनंजय येरुळकर (पोलीस निरीक्षक), डी.बी. कोकनर (फौजदार), बी.के. पाचोळे (फौजदार) दोघे अजून हजर झालेले नाहीत.४५ पोलीस कर्मचारी