शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नव्या अध्यक्षांचा ‘सीईओं’ना दणका

By admin | Updated: October 23, 2014 00:17 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर आचारसंहितेमुळे विजयसिंह पंडित यांना पदभार स्वीकारण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर बुुधवारी महिन्यानंतर त्यांनी सूत्रे स्वीकारली.

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर आचारसंहितेमुळे विजयसिंह पंडित यांना पदभार स्वीकारण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर बुुधवारी महिन्यानंतर त्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी सीईओ राजीव जवळेकर यांची गैरहजेरी होती. ‘अध्यक्ष चार्ज घेत असताना गैरहजर राहून सीईओंनी प्रोटोकॉल तोडला आहे, अशा प्रकारची बेशिस्त कदापि खपवून घेणार नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत आयुक्तांकडे तक्रार केली. त्यांनी अधिकाऱ्यांना शिस्तीचे ‘धडे’ ही दिले.२१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया चिठ्ठ्या टाकून केली होती. नशिबाने तारल्यामुळे विजयसिंह पंडित व आशा दौंड यांना अनुक्रमे अध्यक्ष- उपाध्यक्षपदाची ‘लॉटरी’ लागली होती. अध्यक्ष पंडित यांनी बुधवारी दीपावलीच्या मुहूर्तावर सकाळी साडेअकरा वाजता पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. सीईओ राजीव जवळेकर, मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांनी मात्र नुतन अध्यक्ष पंडित यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पदभार स्वीकारल्यावर पंडित यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार झाला. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर सत्काराला उत्तर देताना विजयसिंह पंडित म्हणाले, पक्षाने टाकलेली माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांत समन्वय असला पाहिजे. निर्णय घेताना माझ्यापेक्षा अनुभवी पदाधिकाऱ्यांचे मला नक्की मार्गदर्शन मिळेल. सर्वांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.यावेळी सभापती संदीप क्षीरसागर, संजय दौंड, मोहन मुंडे, नारायण शिंदे, बबन गवते, सतीश पवार, माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे उपस्थित होते. प्रास्ताविक नईमोद्दीन कुरेशी यांनी केले. सूत्रसंचालन सहायक लेखा व वित्त अधिकारी ए. बी. घायाळ यांनी केले.कृतीआराखडा तयार करणारमाध्यमांशी संवाद साधताना अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले, यापुढे बैठकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक होऊन त्यात कुठले विषय चर्चेत घ्यायचे हे ठरविले जाईल. यापूर्वी काही कामांत अनियमितता झाली आहे हे मान्य करत त्यांनी अडीच वर्षांत करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. दांडीबहाद्दरांना वठणीवर आणणारअधिकारी- कर्मचाऱ्यांनी नोकरीशी बांधिलकी जपावी. अनियमितता, कुचराई कदापिही खपवून घेतली जाणार नाही, असे अध्यक्ष पंडित म्हणाले. म्होरक्याच बेशिस्त असेल तर इतर अधिकारीही तसेच वागतात त्यामुळे तो पायंडा पडत जातो. हे थांबले पाहिजे.जिल्हा परिषदेची ‘घडी’ बसविण्यासाठी प्रयत्न करणार असून घरी बसून कोणी कारभार हाकत असेल तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा दम त्यांनी भरला. शिस्त पाळा, अन्यथा गय केली जाणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)नुतन अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी पदभार घेतल्यावर सभागृहात त्यांचा सत्कार झाला. ४ते ज्या खुर्चीत बसले होते, तिची एक बाजू तुटलेली होती. टेबलवर धूळ होती. तसेच सभागृहात स्वच्छतेचा अभाव होता. ४याचा संदर्भ देत पंडित म्हणाले, मी ज्या खुर्चीत बसलो आहे ती देखील व्यवस्थित नाही. खुर्चीपासून सारेकाही दुरुस्त करायचे आहे.४जिल्हा परिषदेला शिस्त आणून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अध्यक्ष पंडित म्हणाले, मी चार्ज घेणार असल्याचे आमच्या स्वीय सहायकाने सीईओ जवळेकरांना कळविले होते. ४त्यांनी आयुक्तांची बैठक असल्याचे सांगितले;पण बैठक रद्द झाली. बैठकीच्या नावाखाली ते गैरहजर राहिले. ४सीईओ आऊट आॅफ होते तर त्यांचे पीए चंद्रकांत पांडव हे देखील स्वीच आॅफ होते. त्यामुळे अध्यक्ष पंडित यांनी नाराजी व्यक्त केली.