शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दामिनी पथकाकडून अकरा सडक सख्याहरींना चोप

By admin | Updated: June 19, 2014 23:48 IST

जालना : महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने बुधवारी गर्दीच्या रस्त्यांवर थांबून महिला व मुलींची छेड काढणाऱ्या अकरा सडकसख्याहरींना चांगलाच चोप दिला

जालना : महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने बुधवारी गर्दीच्या रस्त्यांवर थांबून महिला व मुलींची छेड काढणाऱ्या अकरा सडकसख्याहरींना चांगलाच चोप दिला. त्यामुळे अनेक सख्याहरींनी तेथून पळ काढला. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यापासून त्या परिसरात मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली आहे. त्यासाठी १० महिला पोलिस कर्मचारी दामिनी पथकात नव्याने नियुक्त करण्यात आल्या आहेत. चार महिन्यांपासून दामिनी पथकाने शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात कारवाया करून आंबटशौकीन व सडक सख्याहरींना चांगलीच चपराक दिली होती. मात्र या पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांची पदोन्नतीवर बीड येथे बदली झाली. त्यामुळे त्यांचा पद्भार कमल गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. या पथकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणखी दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. कराटे प्रशिक्षण घेतलेल्या या महिला पोलिस कर्मचाऱ्यांची शहराच्या विविध भागात दिवसभर गस्त सुरू असते. दोन दिवसात आठ जणांना चपराक देण्यात आली. हे पथक प्रामुख्याने शाळा, महाविद्यालय, संभाजी उद्यान, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बडी सडक, आझाद मैदान या भागात कार्यरत राहत आहे. पथकाची कुमक वाढविण्यासाठी कमल गिरी यांच्यासह सुमित्रा अंभोरे, संजीवनी गाढे, माधुरी फुके, प्रीती जाधव, अर्चना आधे, गोदावरी सरोदे, ज्योती राठोड, सुरेखा जाधव, रिना मेहेर, मेघा नागलोत,सीमा देठे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर रेंगाळणाऱ्यांना चपराकशाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या पथकाने सी.टी.एम.के. गुजराती विद्यालय, सरस्वती भुवन प्रशाला, दानकुँवर कन्या विद्यालय, महाविद्यालय, जेईएस कॉलेज, एम.एस.जैन शाळा तसेच विविध कोचिंग क्लासेसच्या परिसरात जाऊन तेथे रेंगाळत फिरणाऱ्या तरूणांना चपराक दिली.