औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद सायकलिंग संघटना व गेट गोइंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सशक्त करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेते, त्याचाच हा भाग आहे. या रॅलीला आकाशवाणी चौकातून सकाळी ६ वाजता सुरुवात होईल. सिडको बसस्थानक, जळगाव रोड, हर्सूल टी पॉइंट, दिल्लीगेट, मिलकॉर्नर, बसस्थानक, बाबाचौक, क्रांतीचौकमार्गे आकाशवाणीला समारोप होईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी डॉ.उमा महाजन, जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव चरणजितसिंग संघा यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त महिला, मुलींसह सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
महिला दिनानिमित्त सायकलिंग रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:33 IST