पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव शिवारामध्ये अवकाळी पाऊसामुळे हळद पिकावर करपा रोग पडला आहे.या परिसरात मागील दोन दिवसांपूर्वी हजेरी लावलेल्या पावसाने हळद पिकाला करपा रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यातच हरभरा, गहू, तूर ही पिकेही दोन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे संकटात सापडली आहेत. हळद पीक घेण्यासाठी लावलेल्या बेण्याचाही खर्च निघेल की नाही, ही भीती शेतकर्यांना आहे.गुरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कवडीमोल दराने जनावरे विकली जात आहेत. शासनाकडून काहीतरी मदत होईल, या आशेवर विसंबून आहे./ (प्रतिनिधी)
हळद पिकावर करपा रोग
By admin | Updated: January 6, 2015 11:52 IST